विद्यार्थ्यांसाठी 'शिकू या' प्रयोगातून विज्ञान उपक्रम

विद्यार्थ्यांसाठी 'शिकू या' प्रयोगातून विज्ञान उपक्रम

निफाड । प्रतिनिधी | Niphad

आजचे जग विज्ञान तंत्रज्ञानाचे (Science Technology) आहे, शालेय जीवनात विज्ञान विषयाचे अध्ययन (Study of science subject), अध्यापन करीत असताना प्रात्यक्षिक, प्रयोगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

प्रयोगातून विद्यार्थ्यांच्या (students) निरीक्षण शक्तीला (Power of observation) वाव मिळतो, अनुमान काढता येते, बुद्धिमत्ता प्रगल्भ (Intelligence profound) होते, तार्किक विचार करण्याची क्षमता विकसित होते.

स्वयंनिर्णय क्षमता वाढते, विषयाचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त होते. उद्याच्या भविष्यातील विद्यार्थी विज्ञान असावा या दृष्टीने शाळेमध्ये (school) विविध उपक्रम राबवले जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून निफाड (niphad) येथील वैनतेय विद्यालयात शिकूया प्रयोगातून विज्ञान या मार्गदर्शक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळ निफाड (Justice Ranade Vidya Prasarak Mandal Niphad) आणि सायन्स फोरम नाशिक (Science Forum Nashik) यांच्या संयुक्त विद्यमाने वैनतेय विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी शिकू या प्रयोगातून विज्ञान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्या.रानडे विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे कार्यकारी विश्वस्त वि.दा. व्यवहारे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव रतन वडघुले, संस्थेचे विश्वस्त राजेश सोनी, मधुकर राऊत, विश्वास कराड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नाशिक येथील सायन्स फोरमचे सदस्य प्रा.डॉ.वसंत बर्वे, प्रा.डॉ.प्रवीण जोशी, प्रा.डॉ. प्रकाश लांडगे, प्रा.डॉ.एस.बी. सुपेकर उपस्थित होते.

प्रास्तविक व प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य एम.एस. माळी यांनी केला. याप्रसंगी डॉ.वसंत बर्वे यांनी मनोरंजनातून विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करताना विविध मनोरंजनात्मक कृतीयुक्त प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. बर्वे यांनी डिजिटलद्वारे 120 समीकरणातून स्क्रीनवर वेगवेगळ्या डिझाईनची निर्मिती करून दाखवली.

त्याचप्रमाणे टेलीपिक्चर द्वारे थोर पुरुषांचे रेखाचित्र स्क्रीनवर रेखाटून दाखवले. तसेच 20 त्रिकोणाच्या निर्मितीतून तयार झालेले आयकोसा हायड्रा या रेखाचित्राची निर्मिती विविध रंगछटाद्वारे स्क्रीनवर रेखाटून दाखवली तर प्रा.डॉ. प्रवीण जोशी, प्रा.डॉ.प्रकाश लांडगे यांनी विविध इलेक्ट्रॉनिक साहित्याद्वारे प्रयोगाची प्रात्यक्षिके दाखवली. यामध्ये क्षेत्रफळ आणि दाब याचा परिणाम, इलेक्ट्रॉनिक मेणबत्ती, इलेक्ट्रॉनिक हार्मोनियम द्वारे संगीत वाजवणे, डोर ओपनिंग आलार्म, वॉटर लेवल कंटेनर, स्मोग आलार्म, रनिंग लाईट, सोलर फॅन, सोलर स्टडी लॅम्प आदी प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांची मने जिंकली.

यावेळी वि.दा. व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य एम.एस. माळी, उपप्राचार्य बी.के. ठोके, पर्यवेक्षक एन.डी. शिरसाट, टी.एस. तलवारे, प्राचार्य देवेंद्र सांबरे, सी.आर. जाधव, विनोद परदेशी, श्रीमती एस.एन. पटेल, संतोष ससाणे, श्रीमती आर.एस. गायकवाड, कल्पेश खैरनार, श्रीमती डी.एस. ढिकले, श्रीमती आर.डी. पवार आदींसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप चकोर यांनी केले तर सी.आर. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com