चुकीच्या नोंदी दुरुस्तीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

चुकीच्या नोंदी दुरुस्तीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

लासलगाव। वार्ताहर | Lasalgaon

नाशिक जिल्ह्याच्या (nashik district) सांख्यिकी विभागाकडून (Department of Statistics) आलेल्या पत्रकामध्ये तालुक्यातील लासलगाव (lasalgaon) आणि पिंपळगाव (pimpalgaon) नजिक या दोन गावांच्या नोंदी शहरी विभागात अर्थात अर्बन भागामध्ये असल्याचे दाखवले आहे. मात्र ही दोन्हीही गावे ग्रामीण भागात (rural area) येणारी असून दोन्ही गावांमध्ये ग्रामपंचायत (gram panchayat) प्रशासन आहे.

मात्र सेन्सेस ऑफ इंडिया 2011 (Census of India 2011) नाशिक जिल्हा सेन्सेक्स हँडबुक (Nashik District Sensex Handbook) यांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये क्रमांक 23 आणि 24 वर ही दोन गावे शहरी भागात दाखवल्याने नवोदय विद्यालयाच्या अ‍ॅडमिशन साठी तसेच केंद्र सरकार (central government) आणि राज्य सरकारच्या (state government) कार्यालयीन कामांमध्ये या गावांना शहरी विभागाचे नियम लागू होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासाठी असणार्‍या सवलतींचा लाभ नागरिक व विद्यार्थ्यांना (students) घेता येत नसल्याचे दिसून आले आहे.

नवोदय विद्यालयामध्ये अनेकांना या चुकीमुळे प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस सचिन होळकर (Nashik District Congress Committee General Secretary Sachin Holkar) यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे (Additional Collector Babasaheb Pardhe) यांना पुराव्यासह लेखी निवेदन (memorandum) देऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी तत्काळ संबंधित विभागांना योग्य त्या सूचना केल्या. हा विषय पूर्णपणे मार्गी लागून नवीन यादी जाहीर होईपर्यंत आपण प्रयत्न करणार असल्याचे होळकर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com