धक्कादायक! एकाच दिवसात विक्रमी 38 मृत्यू; 3 हजार 588 पॉझिटिव्ह रूग्ण

धक्कादायक! एकाच दिवसात विक्रमी 38 मृत्यू; 3 हजार 588 पॉझिटिव्ह रूग्ण

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कारोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवसात आतापर्यंतचे विक्रमी 38 मृत्यू कोरोनामुळे झाले आहेत.

यामध्ये ग्रामिण भागातील तब्बल 22 मृत्यू आहेत तर दिवसभरात 3 हजार 588 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कालच्या तुलनेत हे दोनशेने कमी असले तरी हा आकडा मोठाच आहे. तर आज रोजी जिल्हाभरातील विविध रूग्णालयात 41 हजार 314 करोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. रविवारी हा आकडा 3 हजार 741 वर पोहचला होता. आज यामध्ये घट आली आहे. असे असले तरी इतर दिवसांच्या तुलनेत हा आकडाही मोठा आहे.

परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 2 लाख 43 हजार 212 वर पोहचला आहे. मागील चोवीस तासात 3 हजार 928 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 94 हजार 267 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 3 हजार 588 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 1 हजार 887 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 43 हजार 212 वर पोहचला आहे.

ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 568 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 77 हजार 331 झाला आहे. मालेगावात 95 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 9 हजार 809 झाला आहेे. जिल्हा बाह्य 38 रूग्ण आढळल्याने याचा आकडा 3 हजार 277 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून आज एकाच दिवसात जिल्ह्यात विक्रमी 38 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात ग्रामिण भागातील सर्वाधिक 22, नाशिक शहरातील 13 रूग्ण आहेत, मालेगाव 2 तर जिल्हाबाह्य 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 720 इतका झाला आहे.

याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 4 हजार 672 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 316 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 277 तर मालेगाव येथील 49 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण कोरोना बाधित : 2,33,629

* नाशिक : 1,43,212

* मालेगाव : 9,809

* उर्वरित जिल्हा : 77,331

* जिल्हा बाह्य :3,277

* एकूण मृत्यू: 2,720

* करोनमुक्त : 1,94,267

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com