समर्पण करतो तोच नेता : मुंडे

समर्पण करतो तोच नेता : मुंडे

नांदूरशिंगोटे | वार्ताहर | Nandurshingote

नेता कोणालाही होता येईल. मात्र, जो सर्वसामान्यांसाठी समर्पण करतो, तोच खरा लोकनेता होतो. स्व. मुंडे साहेबांनी आम्हालाही हीच शिकवण दिली असल्याचे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले...

येथील स्व. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारकाची पाहणी केल्यानंतर झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शीतल सांगळे, उदय सांगळे, हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार,

पंचायत समिती सभापती रोहिणी कांगणे, उपसभापती संग्राम कातकडे, माजी सभापती शोभा बरके, सरपंच गोपाळ शेळके उपस्थित होते. पक्षभेद, वर्णभेद व जाती भेदाच्या पलीकडे जाऊन स्व. मुंडे यांनी राजकारण केले.

गोपीनाथ गडाच्या संकल्पनेपेक्षाही येथे असलेले प्रेम व माझ्यावरचा विश्वास त्याला कधीही तडा जाऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. हे स्मारक माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

यानंतर त्यांनी येथील अभ्यासिकेला भेट दिली व उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार वाजे, सांगळे यांनी स्मारकामागील भूमिका विषद करत स्व. मुंडे यांचे तालुक्याशी असलेल्या नात्यावर प्रकाश टाकला.

आनंद शेळके यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शशिकांत येरेकर यांनी केले. यावेळी जगन पा. भाबड, शंकर शेळके, भारत दराडे, रामदास सानप, नानासाहेब शेळके, निवृत्ती शेळके, रवींद्र शेळके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com