पालकमंत्र्यांच्या नावाने बदनामी करणाऱ्यास अटक

पालकमंत्र्यांच्या नावाने बदनामी करणाऱ्यास अटक

नवीन नाशिक | प्रतिनिधी

पालकमंत्री भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलतोय तुमचा जो काय विषय झालेला आहे याबाबत साहेबांचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे.....

तुम्ही मला समक्ष येऊन भेटा यावर आपण तोडगा काढू असे म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांची बदनामी व कासुर्डे नामक व्यक्तीची फसवणुक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास अंबड पोलिसांनी (Ambad Police) अटक केली आहे....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी ( दि.१८ ) रात्री नऊ वाजेच्या सुमारास संशयित महेंद्र पाटील (Mahendra Patil) (४६, रा. गंगापूर रोड , नाशिक) याने उगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील रहिवासी कासुर्डे ( पूर्ण नाव ठाऊक नाही ) यांना फोन करून मी भुजबळ साहेबांच्या बंगल्यावरून बोलत आहे.

तुमच्या केसमध्ये मी तुम्हाला मदत करू शकतो, माझे भुजबळ साहेबांशी बोलणे झालेले आहे. तसेच माझे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्याशी देखील बोलणे झाले आहे. परंतु तुम्ही समक्ष या नाही तर तुमचा माणूस मला भेटायला पाठवा.

खाली हात पाठवु नका. काय असेल ते करून घेऊ असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नावाने कासुर्डे यांना फोनवर संभाषण करणाऱ्या संशयित महेंद्र पाटील यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

या घटनेची पोलिसांनी माहिती घेतली असता संशयित पाटील याने फोन केला. कासुर्डे यांच्या पत्नीच्या नावे निफाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व पालकमंत्री भुजबळ यांच्या कार्यालयातील अधिकारी महेंद्र पवार यांच्या तक्रारी वरून संशयित महेंद्र पाटील याच्याविरोधात बदनामी व फसवणुकीचा प्रयत्न करणे असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी किशोर कोल्हे अंमलदार पंकज शेळके करीत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com