ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी

ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी

- खासदार डॉ.भारती पवार यांची मागणी
नाशिक । Nashik
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) मधून नाशिक जिल्ह्यातील तालुका ग्रामीण रुग्णालयांसाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करावी, अशी खासदार डॉ.भारती पवार यांनी केली आहे.

जिल्हाभरात दिवसेंदिवस करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोविड-19 या आजाराने बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना ग्रामीण भागातील रूग्णांच्या संख्येत देखील लाक्षणिय वाढत होत आहे.

या गंभिर परिस्थीत जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रूग्णालयात ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. या गंभिर परिस्थितीचं गांभिर्य लक्षात घेऊन दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खा.डॉ.भारती पवार यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेऊन तातडीने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) मधून कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटची निर्मिती करून जिल्ह्यातील तालुका ग्रामिण रुग्णालयांना सुरळीत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी योग्य ते नियोजन करण्याच्या खा.डॉ.भारती पवार यांनी सूचना केल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com