करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट आहे तरी काय?

करोनाचा डेल्टा प्लस व्हेरियंट आहे तरी काय?
करोना

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

करोनाचा (Covid-19) नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus variant) भारतासह महाराष्ट्रात आढळून आला आहे. करोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरण्यास ’डेल्टा’ व्हेरियंट कारणीभूत ठरला होता...

देशात कोव्हिड-19 ची तिसरी लाट (Third wave of Covid-19) येण्याची भीती वर्तवण्यात येत असतानाच ’डेल्टा प्लस’ व्हेरियंटची धास्ती सर्वांनीच खाल्ली आहे. सर्वत्र तिसर्‍या स्टेजमधील (Third stage) निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हा व्हायरस अधिक धोकेदायक असल्याने चिंता मात्र सर्वांचीच वाढली आहे.

काय आहे हा डेल्टा प्लस व्हेरियंट?

डेल्टा व्हेरियंटमध्ये म्युटेशन्स (Mutations) होऊन डेल्टा प्लस व्हेरियंट तयार झाला आहे. ’डेल्टा प्लस’ व्हेरियंटमध्ये डेल्टा व्हेरियंटमध्ये असलेले सर्व म्युटेशन आहेत. भारतात सर्वात पहिल्यांदा आढळून आलेल्या ’डेल्टा व्हेरियंट’चे शास्त्रीय नाव इ.1.617.2 आहे. त्यानंतर डेल्टा व्हेरियंटमध्ये हळूहळू बदल होत गेले. ’डेल्टा प्लस’ व्हेरियंट’चे शास्त्रीय नाव इ.1.617.2.1 असे आहे.

कसा तयार झाला हा व्हेरियंट?

कोरोना संसर्गाची दुसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी ’डेल्टा व्हेरियंट’ कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन (बदल) झाल्याचे आढळून आले. याला ’डेल्टा प्लस’ किंवा ’-ध.1’ असं नाव देण्यात आले आहे. आतापर्यंत जगभरातील 10 देशांमध्ये डेल्टा प्ल्स व्हेरियंटची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. यात भारत, अमेरिका, युके, कॅनडा, जर्मनी, रशिया, जपानसारख्या देशांचा समावेश आहे.

काय आहेत ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटची लक्षणे

डेल्टा प्लस अधिक संसर्गजन्य आहे. हा विषाणू फुफ्फुसांच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिटकून राहण्यास सक्षम आहे. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता आहे. हा व्हेरियंट आपल्या प्रतिकारशक्तीस चकवा देण्यासही अधिक सक्षम आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचा संसर्ग झालेल्यांना तीव्र खोकला, सर्दी होत आहे. पण सर्दीची लक्षणे मागील विषाणूपेक्षा अगदी वेगळी असल्याचे आढळली आहेत. अभ्यासानुसार, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि सतत नाक वाहणे ही डेल्टा प्लस व्हेरियंटची सर्वसामान्य लक्षणे आहेत.

‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटपासून कसा कराल बचाव?

  • गरज असल्यासच घराबाहेर पडा.

  • घराबाहेर पडण्यापूर्वी मास्क लावा, विशेषत: डबल मास्क वापरा.

  • दिवसातून अनेक वेळा 20 सेकंद तरी हात धुवा.

  • लोकांपासून 6 फूट शारीरिक अंतर अंतर ठेवा.

  • घरात आणि आपला परिसरात स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण ठेवा.

  • बाहेरून आणलेल्या प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकीकरण करा.

धोका टळलेला नाही

करोनाचा (Covid-19) धोका संपलेला नाहीये. व्हायरस नवे रंग दाखवत आहेत. हा व्हायरच अधिक धोकेदायक असल्याचे बोलले जात आहे. यापार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना दुहेरी मास्क (Two Layer Mask) घातला तर अधिक चांगले. हात स्वच्छ धुवा, सामाजिक अंतर पाळा तेव्हाच यापासून खर्‍या अर्थाने बचाव शक्य आहे.

डॉ. राजेंद्र ठिगळे, पॅथॉलॉजिस्ट, नाशिक.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com