शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणारा संगीतमय कार्यक्रम

शेतकऱ्यांचे मनोबल वाढविणारा संगीतमय कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आत्महत्या प्रतिबंधक दिवसानिमित्त (Suicide prevention day)सुरगाणा ( Surgana )तालुक्यातील शिंदे दिगर या गावामध्ये संगीतकार गायक संजय गीते यांनी ‘शेतकरी जिंदाबाद जिंदगी जिंदाबाद’ हा शेतकर्‍यांची मनशक्ती वाढवणारा संगीतमय कार्यक्रम सादर केला.

कुठलेही मूल्य न घेता विनामूल्य ही सेवा त्यांनी या छोट्याशा गावात रुजू केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांना हात जोडून जी साथ घातली आहे त्या सादेला प्रतिसाद देण्यासाठी संजय गीते यांनी हा कार्यक्रम सादर केला. गटविकास अधिकारी गायकवाड यांच्या प्रयत्नातून आणि ग्रामसेवक चौधरी यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमांमध्ये ट्रॅक्टर चालतं डिझेलवरील, बुलेट चालते पेट्रोलवरील आपल्या जीवाचे इंजन चालतं श्वासावरी, पेट्रोल, डिझेल विकत मिळतं पण श्वास आपला फुकट आहे तणाव येईल तेव्हा खोल श्वास घेत जाय. मी हृदयाचा आभारी आहे, मी डोळ्यांचा आभारी आहे, मी या अमूल्य शरीराचा आभारी आहे अशी गाणी सादर करतानाच ऐक शेतकरी राजा, जीव लाखमोलाचा हायर शेतकरी जिंदाबाद जिंदगी जिंदाबाद अशी अनेक भावपूर्ण गीते गाऊन शेतकर्‍यांचा आत्मविश्वास त्यांनी वाढवला.

शेतकरी, मजुरांच्या, वाडीवस्तीतील कष्टकर्‍यांच्या काळजाला थेट हात घालण्याचे काम संजय गीतेच्या सुरांनी केले. त्यामुळे या परिसरातील अनेक महिला शेतकरी महिला पुरुष, युवक यांना संगीतातून आत्मविश्वासाने जगण्याची एक नवी दृष्टी मिळाली. गीते म्हणाले की, संगीताच्या माध्यमातून जर पाऊस पडू शकतो, पिकांची वाढ उत्तम होते, गाय जर उत्तम दूध देऊ शकते तर त्याचा मनशक्ती वाढवण्यासाठी उपयोग करावा ही प्रेरणा मिळाली. संजय गीते गेली अनेक वर्ष हा उपक्रम गावोगावी विनामूल्य पद्धतीने राबवित आहेत. या कार्यक्रमाला लेखक विजय निपाणेकर, ग्रामसेवक चौधरी आणि शिंदे बिगर या गावातील अनेक गावकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com