रक्षाबंधनातून एकात्मता संदेश

रक्षाबंधनातून एकात्मता संदेश

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

बहीण-भावाच्या अतूट नात्याचा प्रतीक असलेला रक्षाबंधन सण (Rakshabandhan festival) आज मनमाड (manmad) शहर-परिसरासह ग्रामीण भागात

पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. करोनामुळे दोन वर्षानंतर रक्षाबंधन सण साजरा करण्याची भाऊ-बहिणींना संधी मिळाल्याने उत्साही वातावरण घराघरात दिसून आले. महिला भगिनींनी पोलीस (police) अधिकार्‍यांना राखी बांधून

त्यांच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेतले तर पोलिसांनी बहिणींना ओवाळणीत राष्ट्रध्वज (national flag) भेट म्हणून दिले. अनेक मुस्लीम तरुणींनी (Muslim girls) हिंदू (hindu) भावांना तर हिंदू भगिनींनी मुस्लीम बांधवाना राखी बांधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश (message of national unity) देत जातीयवाद निर्माण करणार्‍यांना देखील चोख उत्तर दिले.

करोना (corona) संक्रमणाच्या सावटामुळे गत दोन वर्ष सर्वच सण, उत्सवावर निर्बंध आले होते. आता करोना आटोक्यात आल्याने सण-उत्सव धुमधडाक्यात साजरे केले जात आहे. रक्षाबंधन सण (Rakshabandhan festival) देखील आज उत्साहात साजरा करण्यात आला. वंचित बहुजन पार्टीच्या अध्यक्षा अ‍ॅड. आम्रपाली निकम यांच्यासह इतर महिलांनी पोलीस स्थानकात येऊन सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते आणि इतर अधिकारी पोलीस कर्मचार्‍यांना राखी बांधून त्यांच्याकडून रक्षण करण्याचे वचन घेतले तर पोलीस बांधवानी या बहिणींना ओवाळणीची भेट म्हणून राष्ट्रध्वज दिले.

जाती-जातीत भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असतांना दुसरीकडे मात्र अनेक मुस्लीम बहिणींनी हिंदू भावांना तर हिंदू बहिणींनी त्यांच्या मुस्लीम भावांना राखी बांधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आपल्या कृतीतून दिला. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एकत्मता चौक या मुख्य बाजारपेठेसोबत इतर वेगवेगळ्या भागात राखीची दुकाने सजली होती. राखी घेण्यासाठी भगिनीची झुंबड उडाली होती. यावर्षी राख्यांच्या भावात 15 ते 20 टक्के वाढ झाली असली तरी त्याकडे दुर्लक्ष करत महिलांनी उत्साहात राख्यांची खरेदी केल्याचे दुकानदारांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com