सायकल रॅलीतून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश

सायकल रॅलीतून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

ज्युनिअर चेंबर्स इंटरनॅशनल (Junior Chambers International)व नाशिक सायकलिस्टतर्फे ( Nashik Cyclist) नाशिकरोडला सायकल रॅली ( Cycle Rally )काढून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यात आला. दोनशे सायकलस्वारांनी सहभाग नोंदविला. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.

महापालिका शाळा क्रमांक 125 येथे असोसिएशनचे उपाध्यक्ष दिलीप मेढे, मुकेश चांडक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. सत्कार पॉईंट, नाशिकरोड बसस्थानक, शिवाजी महाराज पुतळा, बिटको पॉईट, जेलरोड, नांदूरनाका, मिरची हॉटेल मार्गे अण्णा गणपती ते पुन्हा शाळा क्रमांक 125 असा रॅलीचा मार्ग होता. महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक शैलेंन्द्र तनपुरे यांच्या हस्ते आयर्न मॅन अश्विनी देवरे, दक्षिण अफ्रिकेतील जगातील सर्वात जुन्या कॉम्रेड मॅरेथानमध्ये यशस्वीपणे सहभाग नोंदविणारे हेमंत अपसुंदे, उमेश बुब, चेतन अग्नीहोत्री, युवा उद्योजक भाऊसाहेब पवार, अमोल वाघ यांचा सत्कार झाला.

जेसीआय झोन 13 चे अध्यक्ष सौरभ बराडीया, नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष किशोर माने, जेसीआय मल्टिपर्पसचे अध्यक्ष मुकेश चांडक, आनंद भागवत, अंकुश सोमाणी, भरत निमसे, हितेश शहा, महेश कासट, निखील जाजू, संतोष बोथरा आदींची प्रमुख उपस्थिती होती. जेसीआयचे अध्यक्ष हेमंत कोल्हे, नाशिक सायकलिस्टच्या उपाध्यक्षा नलिनी कड, डॉ. प्रभाकर गायखे, सचिव सौरभ मंडलेचा, जेसीआय सप्ताहाचे अध्यक्ष मोहन सानप, उपाध्यक्ष निलेश शिंदे, संदीप शिंदे, किरण गोरे, गणेश उशीर आदींनी संयोजन केले. जेसीआयच्या सदस्यांनी परिसरात स्वच्छता मोहिम राबविली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com