नाशिक : भंगार गोडाऊनला भीषण आग; साहित्य जळून खाक

नाशिक : भंगार गोडाऊनला भीषण आग; साहित्य जळून खाक

नाशिक | Nashik

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) मटाणे (Matane) येथे भंगारच्या गोडाऊनला (Scrap Godown) भीषण आग (Terrible Fire) लागल्याची घटना घडली असून या आगीत लाखो रुपयांचे नुकसान (Damage) झाले आहे. तसेच सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे...

नाशिक : भंगार गोडाऊनला भीषण आग; साहित्य जळून खाक
Nashik : भुसावळ आणि मनमाड रेल्वे पोलिसांनी केली ५९ बालकांची सुटका; काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, मटाणे येथे भिकाशेठ पवार यांचे भंगारचे गोडाऊन असून आज दुपारच्या सुमारास गोडाऊनला भीषण आग लागली. यावेळी काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात आगीचे व धुराचे लोट पसरले होते. या गोडाऊनमध्ये प्लास्टिक, लाकडी, लोखंडी, काच अशा विविध प्रकारचे भंगारचे सामान होते.

नाशिक : भंगार गोडाऊनला भीषण आग; साहित्य जळून खाक
सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण; मुख्यमंत्र्यांनी दिले 'हे' आदेश

दरम्यान, यानंतर आग विझविण्यासाठी प्रयत्न करूनही यश येत नसल्याने तातडीने सटाणा आणि मालेगाव (Satana and Malegaon) येथील अग्निशमन दलाला (Fire Brigade) पाचारण करण्यात आले. मात्र, तरीही आग विझवण्यास अडचणी येत होत्या. तसेच त्यानंतरही आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com