
सिन्नर । वार्ताहर | Sinnar
महिलांनी संकटांना न घाबरता आत्मविश्वासाने (confidence) व खंबीरपणे तोंड देणे ही काळाची गरज आहे.
चांगल्या व्यक्तींच्या (good person) सहवासानेच मनुष्य घडतो तर वाईट प्रवृत्तीच्या सहवासात बिघडतो. म्हणूनच मुलींनी आपल्या परिसरातील विविध मानवी संकटाचा स्वसामर्थ्यावर विरोध करुन आपल्या करिअरच्या (Career) दिशेने यशस्वी वाटचाल करावी, असे प्रतिपादन प्रा. एस. टी. भागवत (Prof. S. T. Bhagwat) यांनी केले.
दोडी महाविद्यालयात (college) महिला सबलीकरण (Women Empowerment) व कौटुंबिक हिंसाचार (Domestic violence) या विषयावर व्याख्यानमालतील पहिले पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य प्रा. एस. बी. भाबड होते. आजच्या काळात महिलांनी स्व:संरक्षणासाठी (Self-defense) कराटे कौशल्ये (Karate skills) स्वतःहून प्राप्त करणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला अनेक घातक घटक त्रासदायक ठरत असतात. त्यांना वेळीच अटकाव केला नाही तर त्यांचे मनोधैर्य वाढत जाऊन त्यातून महिला सबला होण्याऐवजी अबला होण्याची शक्यता अधिक असते. याविरुद्ध महिलांनी आवाज उठविणे गरजेचे असल्याचे भागवत म्हणाल्या.
दुसर्या पुष्पात पंचाळे येथील आयडीयल स्पोर्ट कराटे असोसिएशनचे भागवत बेलोटे, शीतल डावखर आणि श्वेतांंबरी बेलोटे यांनी महिलांचे स्वसंरक्षण (Women's self-defense) व प्रशिक्षण यावर मार्गदर्शन केले. प्रशांत सानप, तृप्ती काकड, गणेश आव्हाड, संजय गायकवाड, रोहिणी डावखर यांनी विद्यार्थीनीना कराटे प्रशिक्षण (9Karate training) दिले. स्वसंरक्षणाची गरज महिलांबरोबरच पुरुषांनादेखील आहे. त्यामुळे कौशल्ये आत्मसात करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरत असल्याचे बेलोटे म्हणाले. तिसरे पुष्प लासलगाव महाविद्यालयाच्या डॉ. प्रतिभा जाधव यांनी ‘लिंगभाव समानता जागृती-सहसंवाद व सहवेदना’ या विषयावर गुंफले.
पूर्वीची स्री ही चूल आणि मूल या चक्रव्युहात अडकून पडली होती. तिला त्यातून बाहेर येण्यास असंख्य वर्षे लोटली गेली. पुरुषसत्ताक पद्धतीला महिलांनीच नकळत खतपाणी घातले. त्यामुळे स्रियांना जागृत करणे गरजेचे असल्याचे डॉ. जाधव म्हणाल्या. ज्येष्ठ व्यक्तीकडून बालपणापासूनच मुलामुलींच्या बालमनावर स्री-पुरुष भेदभावाची वागणूक नकळतपणे कशी मिळत जाते याबाबत अनेक उदाहरणे देत पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत महिला कशा भरडल्या जातात याचे त्यांनी विश्लेषण केले. प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. निलेश वाकचौरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. कल्पना घुगे यांनी केले. आभार प्रा. बाबासाहेब कासार यांनी मानले.