बँक खात्यातून परस्पर लांबवले पैसे

बँक खात्यातून परस्पर लांबवले पैसे

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कर्ज (Loan) मिळवून देण्याचे आश्वासन देत अज्ञात व्यक्तीने एकाच्या बँक खात्यातून (Bank account) परस्पर लाखो रुपये लांबविल्याच्या प्रकार घडला आहे. या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद वसंत खरात (Milind Kharat) (38, रा. आर्टिलरी सेंटर रोड) यांनी एका खासगी फायनान्स कंपनीत कर्ज मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता.

त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांना फोन व व्हॉट्सअ‍ॅपवरून एका खासगी फायनान्स कंपनीचे (Private Company) खोटे ओळख पत्र (Identity card) पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.

खरात यांना पर्सनल लोन (Personal loan) देण्याचे आमिष दाखवून प्रोसेसिंग व इतर फीच्या बहाण्याने त्यांच्याकडून बँक खात्याची माहिती मिळवून घेतली.

त्यांच्या बँक खात्यातील १ लाख ९ हजार ९०५ रुपये अज्ञात भामट्याने परस्पर काढून घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पंकज भालेराव करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com