शेतात आढळला मृत अवस्थेत बिबट्या

शेतात आढळला मृत अवस्थेत बिबट्या

नाशिक | Nashik

येथील शेवगेदारणा परिसरातील (Shevgedarana Area) शेतकरी चंद्रभान नामदेव कासार यांच्या मालकीच्या गट नंबर २७६ मध्ये आज (दि.१५) रोजी बिबट्या (Leopard) मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे...

याबाबत मृत बिबट्याची वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी (Forest Department) पाहणी केली असता मानेवर जखमा दिसून आल्या. तसेच सदर बिबट्याला हिंस्त्र प्राण्याने हल्ला करून ठार केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्यास ताब्यात घेत शविच्छेदन (Autopsy) करून गंगापूर रोपवाटीका (Gangapur Plantation) येथे अंत्यसंस्कार केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com