
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन (Combing operation) दरम्यान दोन सराईतांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार मोटार सायकल (Motorcycle) व १७ मोबाईल (Mobile) हस्तगत करण्यात आले.
पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner of Police Jayant Naiknavare) यांच्या आदेशानुसार व उपायुक्त अमाल तांबे (Deputy Commissioner Amal Tambe), सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे (Assistant Commissioner Gangadhar Sonawane) यांचे मार्गदर्शनाखाली परिमंडळ १ मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी पेट्रोलिंग (Patrolling),
कॉम्बिंग ऑपरेशन (Combing operation), टवाळखोर कारवाई, रेकॉर्ड वरील आरोपी चेकिंग अशी स्वतंत्र पथक तयार करून कारवाई सुरू होती. दरम्यान आडगाव पोलीस ठाण्याचे डीबी पथकाचे अंमलदार सुरेश नरवडे, निलेश काटकर, वैभव परदेशी, सचिन वाहिकर आदींचे पथक हद्दीत रेकॉर्ड वरील आरोपी गुन्हेगार चेकिंग करीत असताना 03 संशयित इसम हे तपोवन भागात फिरत असताना दिसले.
त्यांना हटकताच ते पळू लागले म्हणून त्यांचा संशय आल्याने त्यांचा पाठलाग करून त्यांना दोघांना पकडले व त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी मोहम्मद सद्दाम मारूफ खान (23, धंदा-मजुरी रा. गाव आहाड पोस्ट अहाडी तहसील जोगिया उदयपूर जि. सिद्धथनगर उत्तर प्रदेश), मेहताब अली करमदार खान (22, धंदा-मजुरी रा. ग्राम करमा पोस्ट सोनहा बस्ती, भानपुर उत्तर प्रदेश) अशी सांगितली.
पोलिसांनी (police) त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २२ हजार रुपये किमतीचे ३ मोबाईल आढळून आले. पोलिसांना यावरून संशय आल्याने त्यांनी सदर संशयितांचे रेकॉर्ड तपासले असता नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली.
दरम्यान न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असता त्यादरम्यान त्यांनी त्यांचा फरार साथीदार सलाहुद्दीन आयुब (रा. अंबड) यांनी मोटर सायकल व मोबाइल चोरी केल्याची कबुली दिली दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून चार मोटारसायकलसह १७ मोबाईल असा १ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पोलीस फरारी संशयिताचा शोध घेत आहेत.
ही कामगिरी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे,सहाय्यक आयुक्त गंगाधर सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनी इरफान शेख,सपोनी हेमंत तोडकर,अंमलदार भास्कर वाढवणे, सुरेश नरवडे, विजयकुमार सूर्यवंशी, निलेश काटकर ,वैभव परदेशी, सचिन वहिकर, देवानंद मोरे, भरत देशमुख, देसले यांनी केली.