ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

नातेवाईकांकडून संताप
ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

सिन्नर । वार्ताहर Sinnar

शहरातील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात ( Rural Sub District Hospital ) मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने दुःखद प्रसंगातही नातेवाईक आणि मृतदेहाचीही हेळसांड होत आहे. असाच खेदजनक, तितकाच संताप निर्माण करणारा प्रसंग नुकताच घडला.

सरदवाडी रस्त्यालगतच्या संजीवनी नगर भागारतील अशोक कारभारी पाटोळे यांचे हृदयविकाराने निधन झाले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला गेला. मात्र, तिथे नातेवाईकांना ताटकळत रहावे लागले. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी सेवकच उपलब्ध नव्हता. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन ठोंबरे यांना विचारणा केली असता त्यांनी आमचेकडे पी.एम. साठी माणूस उपलब्ध नाही, तसे आम्ही वरिष्ठांना लेखी कळवले आहे व वरिष्ठ अधिकारी 15 दिवस सुटीवर असल्याने आम्ही काही करु शकत नाही, अशी उडवा-उडवीचे उत्तर मृताच्या नातेवाईकांना त्यांनी दिले.

त्यामुळे आता करायचे काय असा प्रश्न नातेवाइकांसमोर उभा ठाकला. माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांशी संपर्क करुन ही बाब निदर्शनास आणली असता त्यांनीही तीच री ओढत पर्यायी मार्ग शोधून कळवतो असे सांगितले. एखाद्या कुटुंबातला माणूस मृत्युमुखी पडतो, तेव्हा संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो. अशा प्रसंगात अडचण येता कामा नये, असे माजी नगरसेवक पावसे यांनी डॉ. ठोंबरे यांना सांगितले.

नगरपालिका दवाखाना बंद झाल्याने शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयाअंतर्गत होते. मात्र, यापूर्वी नगरपालिकेचा पूर्णवेळ सेवक हे काम करत असे. त्याला ग्रामीण रुग्णालयाकडून मानधन देणे शक्य नसल्याचे वरिष्ठांचे म्हणणे आहे. शवविच्छेदनाचे काम अवघड आहे. त्यामुळे या कामासाठी कोणीही तयार होत नाही. लवकरच यावर तोडगा निघेल.

डॉ. चेतन ठोंबरे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सिन्नर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com