पंचवटीत होणार 'इतक्या' खाटांचे रुग्णालय; कोटींचा आराखडा आरोग्य मंत्रालयाला सादर

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

पंचवटी विभागातील (panchavati division) नागरिकांसाठी 100 खाटांच्या रुग्णालयाचा आराखडा (Layout of the hospital) तयार झाला होता. मनपाच्या माध्यमातून ते उभारण्यात येणार होते.

मात्र सिंहस्तातील गरज व रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन त्याजागी 300 खाटांचे रुग्णालय बनवण्याचा प्रस्ताव आ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikle) यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पिय तरतूदीसाठी राज्य शासनाकडे (state government) पाठवला आहे. त्यासाठीच्या 232 कोटी रुपयांचा आराखडा आरोग्य मंत्रालयाला (Ministry of Health) सादर करण्यात आला आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात रुग्णालयाला निधी (fund) प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पंचवटी परिसराची वाढलेली लोकसंख्या व आगामी कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela) पार्श्वभूमीवर मालेगाव स्टॅन्ड वरील अग्निशामक दलाच्या कार्यालयाला (अग्निशामक दलाच्या कार्यालया) लागून असलेली 14 हजार 194 चौरस मीटर जागेवर हे रुग्णालय उभारण्यात यणार आहे. आमदार अ‍ॅड.राहुल ढिकले यांनी 300 खाटांच्या रूग्णालयाचा प्रस्ताव दिला होता. त्याअनुषंगाने महापालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनी वैद्यकीय विभाग (Medical Department) व नगररचना विभागाला जागेचे सर्वेक्षण (Survey) करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वैद्यकीय विभागाने जागेची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाचा आराखडा निश्चित केला.

मनुष्यबळाची मोठी गरज

रुग्णालयात 25 विशेष तज्ञ, 39 वैद्यकीय अधिकारी, 224 स्टाफ नर्स, 68 तांत्रिक, 24 प्रशासनिक, 10 डाटा एन्ट्री ऑपरेटर, 60 वॉर्डबाय, 48 आयांची पदभरती केली जाणार आहे. रुग्णालयासाठी वार्षिक जवळपास 35 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com