रामशेजच्या शिरपेचात मानाचा तुरा

लोकवर्गणीतून साकारले ऐतिहासिक प्रवेशद्वार
रामशेजच्या शिरपेचात मानाचा तुरा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या गडकिल्ले संवर्धनाचा उपक्रम (conservation of Fort project )सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने हाती घेण्यात आला आहे. त्यातूनच 'स्वराज्याचे प्रवेशद्वार' या उपक्रमाअंतर्गत रामशेज किल्ल्यावर ( Ramshej Fort )लोकवर्गणीतून दोन लाखांचा निधी उभारून सागवानी आणि ऐतिहासिक दिसणारी दोन प्रवेशद्वारे तयार करण्यात आली. या प्रवेशद्वाराचा दुर्गा अर्पण सोहळा किल्ले रामशेजवर सिंहगर्जना ढोल-ताशांच्या गजरात पार पाडला.

पावनखिंड चित्रपटात बाजीप्रभूची भूमिका साकारणारे अभिनेते अजय पूरकर, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. नाशिक जिल्ह्यात यापूर्वी हरिहर, त्रिंगलवाडी या किल्ल्यावर प्रवेशद्वारे बसण्यात आली आहेत. सोमनाथ पांचाळ व नाशिक जिल्हा समन्वयक साईनाथ सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले रामशेजवर साडेतीनशे ते चारशे वजनाचे हे दोन प्रवेशद्वारे अवघ्या 28 मिनिटांत तरुणांनी खांद्यावरून पोहोचवले.

या मोहिमेसाठी नाशिक जिल्ह्यातील तसेच अंबरनाथ, मुंबई, संभाजीनगर, पुणे येथून दुर्ग सेवक सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी भाजप महाराष्ट्र राज्य प्रवक्ता अजित चव्हाण, उद्योजक समीर चव्हाण, स्वराज्य संवर्धनचे भाऊसाहेब चव्हाणके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, धुळे जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, वन अधिकारी अशोक काळे, पोलीसपाटील सुनीता बोडके, श्याम बोडके, संजय बोडके, गणेश नागरे, माधव धात्रक, शिवव्याख्याती साक्षी ढगे, सागर पवार, अतुल धात्रक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com