
निफाड। प्रतिनिधी Niphad
आत्महत्या (suicide) केलेल्या 117 शेतकर्यांची (farmers) मुले व मुली तसेच 10 विधवा पत्नी या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील आधारतिर्थ आश्रमात राहत असून येथून जवळच असलेल्या श्रीमती गार्डा अनाथ बालिका आश्रमात (orphanage) 37 अनाथ मुली राहत असून
या सर्वांची दिपावली (diwali) गोड व्हावी यासाठी येथील समर्थ महिला शिक्षक (teachers) सह. पतसंस्थेच्या वतीने दिवाळीचा फराळ व किराणा साहित्य पतसंस्था चेअरमन मनिषा कर्डीले, व्हा. चेअरमन संजीवनी देशमुख, कार्यवाह सुशिला सोनवणे, बँक प्रतिनिधी दत्तू एकनाथ सानप यांचे हस्ते वाटप करून समाजापुढे वेगळा आदर्श ठेवला आहे.
गरिबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूने समर्थ महिला शिक्षक सह. पतसंस्थेच्या वतीने दिवाळी सणाचे औचित्य साधत आधार आश्रम (Aadhar Ashram) व अनाथ बालकांचे आश्रमात जाऊन तसेच आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या मुलामुलींना दिवाळीचा फराळ व किराणा साहित्य तसेच आत्महत्या केलेल्या शेतकर्यांच्या विधवा पत्नींना साडी वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षक समिती राज्य उपाध्यक्ष पांडूरंग कर्डीले, तालुका अध्यक्ष संजय गवळी, विजय सोनवणे, संदीप गायकवाड, निलेश येवले यांचे उपस्थितीत दान देण्यात आले. त्र्यंबकेश्वर येथील श्री स्वामी समर्थ महाराज गुरुकुल जनकल्याण हॉस्पिटल साठी 11,111 रु. व श्रीक्षेत्र गाणगापूर येथे सुरू असलेल्या दत्तधाम अन्न छत्रालयाला 5,100 रु. देणगी देण्यात आली.
या उपक्रमासाठी पतसंस्था चेअरमन मनिषा कर्डीले, व्हा. चेअरमन संजीवनी देशमुख, संचालक सुशिला सोनवणे, अवंतिका गोसावी, अरुणा पुंड, ज्ञानेश्वरी चव्हाणके, स्मिता सुडके, सुनिता किट्टे, सरिता येवले, विजया नवसारे, रत्ना गायकवाड, अनिता दरेकर, निर्मला शिंदे, दत्तू सानप, अर्चना वैद्य, अनंत गोसावी, रवींद्र चव्हाणके, रमेश गांगुर्डे, उत्तम सोनवणे, संजय बैरागी, दत्तू निफाडे, राजेंद्र पवार,
अविनाश बागडे, संजय गवळी, नवनाथ सुडके, खंडू किट्टे, संदीप गायकवाड, भगवान बर्डे, श्रीकांत देवरे, निलेश येवले, विजय शिंदे, दिलीप कातकाडे, केदू साळवे, नंदकिशोर घोडेकर आदींनी परिश्रम घेतले. करोना (corona) प्रादूर्भावामुळे उद्योगधंदे बंद होते, रोजगाराचा प्रश्न गंभीर होता. अशा परिस्थितीत अनाथ आश्रमातील मुले यांनाही मदतीची गरज असल्याने हीच गरज ओळखून महिला शिक्षक पतसंस्थेने अनाथ मुलांसह आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
महिला पतसंस्थेचे कार्य गौरवास्पद येथील महिला शिक्षक सह. पतसंस्था दरवर्षी सभासद गुणवंत पाल्य, गुणवंत विद्यार्थी बक्षीस समारंभ करतात. यावर्षी करोनामुळे समारंभ होऊ शकला नाही ही खंत पतसंस्थेच्या पदाधिकार्यांना होती. त्यामुळे त्यांनी वार्षिक सर्वसाधरण सभेत मंजुरी घेऊन गरीब, अनाथ मुलामुलींना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून दिवाळी सणाचा फराळ व किराणा माल संस्थेच्या वतीने देऊन आदर्शवत कामगिरी केली.
- पांडूरंग कर्डीले, राज्य उपाध्यक्ष (प्राथमिक शिक्षक समिती)