अनाथ व निराधारांना मदतीचा हात

अनाथ व निराधारांना मदतीचा हात

देवळा । प्रतिनिधी Devela

गरीब-श्रीमंत (Rich-poor) अशी वाढत चाललेली विषमता कमी करण्यासाठी उन्नत समाजाने पुढे यायला हवे आणि यातून व्यक्त होणारी सामाजिक बांधिलकीची भाषा कृतिशील असावी, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर (Former Minister of State Ravikant Tupkar) यांनी येथे बोलताना केले.

येथील शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या (Shivnishchal Sevabhavi Trust) वतीने आयोजित राज्यातील अनाथ (Orphan) व निराधार मुलांना (Destitute children) मदत निधी (Relief fund) वाटप कार्यक्रमात तुपकर बोलत होते. देवळा (Devela) महाविद्यालयाचे प्राचार्य हितेंद्र आहेर अध्यक्षस्थानी होते.

अनाथ, निराधार, गरजू, गरीब, पीडित यांना मदत करण्यासाठी दातृत्वाची भावना मनात असावी व जागवावी लागते, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक प्रा. डॉ. डी.के. आहेर यांनी केले. यावेळी अनाथ व निराधार मुलांना धनादेश (Check) व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अभिनेत्री अश्विनी महांगडे (Actress Ashwini Mahangade) व राज्य टायगर ग्रुपचे संस्थापक अनिकेत घुले यांना शिवनिश्चल पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले.

यावेळी भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष केदा आहेर, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र देवरे, अनिकेत घुले, अश्विनी महांगडे यांनी मार्गदर्शन केले. ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष यशवंत गोसावी यांनी या कार्यक्रमाचा हेतू विशद केला. राजेंद्र गोसावी, महारोजगार केंद्राचे अध्यक्ष भाऊसाहेब पगार, देमकोचे व्हा.चेअरमन राजेंद्र वडनेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवशाहीर सुरेश जाधव व त्यांच्या सहकार्‍यांनी पोवाडे सादर केले. सूत्रसंचालन पूनम गोसावी व ऋषिकेश गोसावी यांनी केले, तर भगवान आहेर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महिलांसह राज्यभरातील शिवनिश्चलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या सहा वर्षांपासून हा अनाथ निराधार मुलांना मदत निधी उपक्रम चालू आहे. आतापर्यंत आत्महत्याग्रस्त, अतिवृष्टीग्रस्त तसेच इतर आपत्तीग्रस्त अशा अनेक कुटुंबांना व त्यातील अनाथ मुलांना शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्टच्या वतीने मदत झाली आहे.

संस्थेने अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्वही स्वीकारले आहे. आगामी काळात अशा मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह उभारण्याचा मानस असल्याचे यशवंत गोसावी यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान पावसाने हजेरी लावली असली तरी श्रोते शेवटपर्यंत बसून होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com