राष्ट्रविकासात वाढत्या लोकसंख्येचा अडथळा: आ. बनकर

राष्ट्रविकासात वाढत्या लोकसंख्येचा अडथळा: आ. बनकर

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Basvant

राष्ट्रविकासात वाढती लोकसंख्या (Population) मोठा अडथळा ठरत असतो. अशा वाढत्या लोकसंख्येला प्रतिबंध (Prevention of population) घालण्यासाठी पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant) येथील ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांच्या पुढाकाराने

तालुक्यातील 55 महिलांनी आणि एका पुरुषाने संततिनियमन करण्यासाठी नसबंदी कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया (Sterilization family planning surgery) करून घेत राष्ट्रीय कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला आहे.

आमदार दिलीप बनकर (MLA Dilip Bankar) यांनी स्वांतत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आरोग्य विभागाला (Department of Health) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर (Family Planning Surgery Camp) घेण्याची सूचना केल्या होत्या. त्यानुसार भिमाशंकर इंग्लिश मिडीयम शाळेसमोरील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील 55 महिला आणि एका पुरुषाने (विजय गवळी) यांनी विनटाक्याची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या.

पाच तास अखंडपणे शस्त्रक्रिया सुरू होत्या. यात महत्त्वाचे म्हणजे काही महिलांनी मुलांचा आग्रह न धरता दोन मुलींवर शस्त्रक्रिया करून घेण्याचे औदार्य दाखविले. वंशाच्या दिव्यासाठी मुलाचा आग्रह न धरता त्या महिलांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. या शिबिरात पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basvant), ओझर मिग (ozar mig), कसबे सुकेणे (kasbe sukene), पालखेड (palkhed), दावचवाडी (davachwadi), कुंभारी आदी गावातील महिलांनी शस्त्रक्रिया शिबिरात आपला सहभाग नोंदविला.

त्यात रुपाली सूर्यवंशी, साक्षी पवार, आरती सुकट, स्नेहा झाल्टे, प्रिया भंडारी, कांचन कराटे, दीपाली धुमाळ, शुभांगी शीलावट, जिजा डगळे, मंगल जहागीरदार, आयेशा शेख, जयश्री शेवरे, भाग्यश्री देसाई, शालिनी दवंगे, मंगल सोनवणे, सविता मोरे, कविता गांगुर्डे आदींसह महिलांनी सहभाग नोंदविला. आमदार बनकर यांनी रुग्णांना व त्यांच्या सोबत आलेल्या पालकांना भोजानाची सोय केली होती.

या एकदिवशिय शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात (District Surgeon Dr. Ashok Thorat), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर (जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर) यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्याधिकारी डॉ.सुजित कोशिरे (Health Officer Dr. Sujit Koshire) यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुनील राठोड (Medical Superintendent Dr. Sunil Rathod) यांच्या उपस्थितीत कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते

यात डॉ.अशोक थोरात, डॉ.वर्षा लहाडे, डॉ.योगेश गोसावी, डॉ.रोहन मोरे, डॉ.कविता आहेर, डॉ.अविनाश पाटील, डॉ. सुमित भोसले, डॉ.मंजुश्री पांडे यांचे शस्त्रक्रिया शिबिरासाठी मोठे योगदान लाभले. तर डॉ.चेतन काळे, डॉ.योगेश धनवटे, डॉ.बकुल पवार, डॉ.सागर गोरे, डॉ.रुपाली आहेर, डॉ.भूषण आहेर, डॉ.अपूर्वा शिरसाठ, आरोग्य सहाय्यक शरद तिडके यांचेसह अनंत मुंढे, शिरीनकुमार मांडे, पांडूरंग भोये, रवी गेहलोत आदींनी शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com