चिमुकलीला मिळाली नवदृष्टी

रोटरीक्लब ऑफ नाशिक मिडटाउनचा पुढाकार
चिमुकलीला मिळाली नवदृष्टी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

उंबरदहाड गाव Umbardahad Village (तालुका पेठ) येथील जिल्हा परिषद शाळेतील Zilla Parishad School तिसरीची चिमुकली दुर्गा मधुकर कुंभार Durga Madhukar Kumbhar हिला दीड वर्षाचे असताना उजव्या डोळ्यात कात्री घुसून डोळा नेहमीसाठी त्रासदायक व अतिशय विद्रुप झाला होता.

वेळोवेळी अनेक ठिकाणी दाखवले, परंतु आर्थिक परिस्थिती तसेच अज्ञानामुळे योग्य उपचार न झाल्याने तिचा उजवा डोळा विद्रूप, अंध व त्रासदायक झाला होता. त्यामुळे शाळेत, समाजात वावरतानाही दुर्गाला शारीरिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागला होता. मात्र पंचायत समिती पेठ, गटशिक्षणाधिकारी व रोटरी क्लब नाशिक मिडटाउन यांची साथ मिळाल्याने तिची यातना व न्यूनगंडातून सुटका झाली.

गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप तसेच पंचायत समिती पेठ यांनी पालकांना तसेच शिक्षकांना समजून सांगितल्यामुळे व रोटरी क्लब नाशिक मिडटाउनपर्यंत दुर्गाला पोहोचवल्यामुळे तिला नवजीवन मिळाले आहे. रोटरी क्लब ऑफ नाशिक-मिडटाउनमार्फत अध्यक्ष डॉ. अमित धांडे व त्यांचे सहकारी डॉ. सुचिता, संदीप, सागर, सुनील या सर्वांच्या प्रयत्नाने 11 जानेवारीस दुर्गावर यशस्वी मोफत शस्रक्रिया झाली. होणार्‍या त्रासातून कायमस्वरूपी मुक्त करून विद्रुपता घालवली.

रोटरीक्लब ऑफ नाशिक मिडटाउनतर्फे Rotary Club of Nashik Midtown सर्वतोपरी मदत करण्यामध्ये डॉ. मनीषा जगताप, अर्चना जोशी, सुनील खकाळे, डी. आर. पाटील, योगशिक्षक संदीप पिंगळे, रवींद्रकौर पनफेर, अवतार सिंग आघाडीवर होते. उंबरदहाड गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रवींद्र गायकवाड, सुनंंदा सोनार, पुनम साळुंके हे सतत दुर्गासोबत उपस्थित राहिले. समाजातील सर्वांच्या प्रयत्नांमुळे एकीचे बळ, मिळते फळ! या उक्तीची प्रचिती दुर्गाला आलीे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com