जानोरीत मुले पळविणार्‍या चोरांची टोळी ?

जानोरीत मुले पळविणार्‍या चोरांची टोळी ?
न्यूज अपडेट २/News update 2न्यूज अपडेट २/News update 2

जानोरी । वार्ताहर Janori

रस्त्याने सायकलवरुन जाणार्‍या भिक्षा (Begging) मागणार्‍याने मला पाणी पिण्यास सांगितले. पण मी ते पिले नाही असे एका शाळकरी मुलीने (schoolgirl) घरी आल्यानंतर सांगितले आणि कल्लोळ उडाला. लागलीच गावात त्याचा शोध घेऊन त्याला ग्रामपंचायतीमध्ये आणण्यात आले.

तो पर्यंत गावात मुले पळविणार्‍याला पकडल्याच्या व्हिडीओ (video) दिंडोरी तालुक्यात (dindori taluka) व्हायरला (viral) झाला. तो पाहुन पोलिसींनीही (police) तत्काळ जोपूळ (jopul) ता. दिंडोरी (dindori) येथे धाव घेतली. संबंधिताची अधिक चौकशी केली असता तो भिक्षेकरी पिंगळा जोशी असल्याचे समोर आले.

संबंधित कुटूंबिय दिंडोरी, पिंपळगाव (pimpalgaon) परिसरात सध्या वास्तव्यास असून ते गावोगावी भिक्षा मागत फिरत आहेत असे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर संभ्रम दूर झाला. मात्र तो पर्यंत सोशल मिडीयाने (social media) या घटनेचा परावचा कावळा करीत लोकांमध्ये विशेषत: शाळकरी मुलांच्या आईवडीलांमध्ये भिती पसरवून दिली होती.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास नारायण विठ्ठल हरगावंकर (30)रा. नांदुसा ता. अर्धापुर जि. नांदेड (जोशी पिंगळा) हा भिक्षा मागण्यासाठी वणी पोलीस ठाणे हद्दीत जोपुळ या गावी आला होता. त्या दरम्यान एक मुलगी सायकलवर क्लास वरुन घरी जात होती. तिला कोणीतरी इसम भेटला व त्याने तिला पाणी देवुन पाणी पिण्यास सांगितले.

तिने पाणी न पिता ती घरी निघुन गेली व तिने घरच्यांना सांगितले की, मला एक भिक्षा मागणारा माणुस पाणी देत होता. त्यावरून तिचे घरचे लोक त्या भिक्षा वाल्याचा शोध घेतला. त्यां नारायण विठ्ठल हरगांवकर हा दिसला. त्यास त्यांनी पकडुन जोपुळ गावचे ग्रामपंचायतीमध्ये आणले. त्यावरून जोपुळ मातेरेवाडी व आसपासच्या खेडयामध्ये मुले पळविणारे इसम असे फोटो सहित बातमी सोशल मिडीयावर ठिकठिकाणी प्रसारीत झाली. साधुच्या वेशात मुले पळवुन नेणारा इसम पकडुन जोपुळ ग्रामपंचायतीचे कार्यालयामध्ये बंदीस्थ केल्याची बातमी पसरली.

सदरचा प्रकार समजल्यावर लागलीच वणी पोलिस ठाण्याचे (Vani Police Station) अधिकारी व कर्मचारी असे घटनास्थळी जावुन संशयित इसम व त्याची पत्नी अशांना वणी पोलिस ठाण्याला घेवुन आले. त्यांची कसून चौकशी केली. त्यांचे नांदुसा ता.अर्थापुर जि. नांदेड येथील पोलीस पाटील व सरपंच अशांकडे चौकशी केली. त्यांनी इसम हा त्याचे भावासह पिंगळा जोशी असल्या कारणाने नगर, संगमनेर, नाशिक,ओझर अशा ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी जात असतात. आता पण ते ओझर ता. निफाड (niphad), नाशिक (nashik) येथे त्यांचे कुंटुंबासह गेले आहे.

त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी नाही व ते चोर्‍या वगैरे करत नाही अशा प्रकारे कळविले आहे. नारायण विठ्ठल हरगावंकर याची चौकशी करता, तो त्याचे भाऊ संजय विठ्ठल हरगांवकार, मारुती विठ्ठल हरगांवकर, भावजय ज्योती संजय हरगांवकर, आशाबाई मारुती हरगांवकर, मावस भाउ कैलास रामचंद्र भगाडे, सारिका कैलास भगाडे असे व इतर जोशी पिंगुळ असल्याकारणाने भिक्षा मागण्यासाठी नगर, नाशिक, ओझर अशा ठिकाणी येवुन भिक्षा मागत असतात.

मुलीचे वडील, चुलते, जोपुळ गांवचे सरपंच, प्रतिष्ठीत नागरीक यांना पण विचारपुस करता, त्यांनी पण सदरचा इसम तसा नसुन झालेला प्रकार गैरसमजुतीने झाला आहे असे सांगितले आहे.सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अफवां वर विश्वास ठेवू नका .काहीही असल्यास तात्काळ वणी पोलिस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन वणी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com