
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik
उपेंद्र नगर परिसरातील एका बंगल्यात चोरी करणाऱ्या संशयिताला त्याच्या साथीदारांसह व लाखो रुपयांच्या मुद्देमालासह अटक करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोहरलाल गोपीचंद गुलाटी (रा. शिवशक्ती बंगला, प्रसाद नगर, ओम कॉलणी, उपेंद्रनगर,, नाशिक) यांच्या बंगल्यात (दि.२९जुलै ) त्यांच्या ऑफिस मध्ये काम करणाऱ्या दिपक पिरुनाथ योगी याने त्यांच्या कपाटातील ३ लाख २५ हजार रुपयांची रक्कम चोरी करून फरार झाल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राउत,सहायक आयुक्त शेखर देशमुख यांनी सदरहु चोरी करणाऱ्याचा तात्काळ शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांना दिले होते.
यावरून अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सागर जाधव व संदिप भुरे यांना खबऱ्यांमार्फत संशयित व त्याचे साथीदार गुन्ह्यात चोरलेल्या रकमेसह गरवारे पॉईन्ट अंबड नाशिक येथे येणार आहे. यावरून गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक नाईद शेख,किरण गायकवाड,राकेश राउत, पवन परदेशी,सचिन करंजे, सागर जाधव, समाधान शिंदे, तुषार मते,घनश्याम भोये,राकेश पाटील, प्रविण राठोड, संदिप भुरे,अनिल गाढवे यांनी गरवारे पॉईन्ट येथे सापळा रचला.
यात इसम नामे दिपक पिरुनाथ योगी ( २२, रा. शिवशक्ती बंगला, प्रसाद नगर, ओम कॉलणी, उपेंद्रनगर, नवीन नाशिक), निलेश बापसिंग राजपुत ( २२, रा. रूम नं ४, दुसरा मजला, मेहतर कॉम्प्लेक्स, कोटक महिंद्र बँक समोर, इंदिरानगर, नाशिक मुळ रामेधपुर सिटी, सेखाखेडी गाव, मध्यप्रदेश),राम बालुजी भिलवाडा (२३ रा रा रूम नं ४, दुसरा मजला, मेहतर कॉम्प्लेक्स, कोटक महिंद्रा बैंक समोर, इंदिरानगर, नाशिक मुळ रा- मेधपुर सिटी, लाखाखेडी गाव, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कडुन गुन्हयातील ३ लाख ५ हजार ४०० रूपये रोख रक्कम हस्तगत करून अटक केले.