
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
फेसबुकवर (Facebook) फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) पाठवत नंतर व्हॉट्सॲपवर (WhatsApp) व्हिडिओ कॉलवरून विवस्त्र अवस्थेत बसून व्हिडिओ रेकॉर्ड करून फेसबुकवर इतर मित्रांना पाठवण्याची धमकी देत वारंवार पैशाची मागणी केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीला फेसबुकवर पूनम शर्मा (Poonam Sharma) या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यानंतर या महिलेने त्यांचा व्हॉट्सॲप क्रमांक मागितला.
दि. 8 रात्री आठ वाजेच्या दरम्यान या व्यक्तीला व्हिडिओ कॉल आला. त्यामध्ये एक महिला विवस्त्र अवस्थेत बसून अश्लील हावभाव व कृत्य करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
समोरील महिलेने त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो त्यांच्या फेसबुकवरील मित्रांना पाठविण्याची धमकी दिली. तसेच इतरत्र न पाठवल्याबद्दल गुगल पेवर वारंवार पैशांची मागणी केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास वपोनी सुरज बिजली करीत आहेत.