बोगस रासायनिक औषध विक्रेत्यांचा धुमाकूळ

बोगस रासायनिक औषध विक्रेत्यांचा धुमाकूळ
देशदूत न्यूज अपडेट

ओझे | विलास ढाकणे |Oze

जिल्ह्यासह दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) अनेक ठिकाणी बोगस रासायनिक औषधे (Bogus Chemical Medicines) व खते विक्रेत्यांचा बोलबाला असून मागील वर्षी अनेक शेतकर्‍यांच्या (Farmers) द्राक्ष निर्यात करण्यासाठी लागणारे निर्यात प्रमाणपत्र न मिळाल्याने पश्चाताप करण्याची वेळ आली होती. यामुळे त्यांच्यावर आर्थिक बोजा पडला होता. यामुळे कृषी विभागाने यावेळी बनावट औषधे, खते विक्री करणार्‍यांना रोखण्यासाठी व्यावसायिकांना परवानगी न देता लक्ष ठेवून कारवाई करावी, अशी मागणी दिंडोरी, पेठ तालुक्यातील शेतकर्‍यांनी केली आहे...

गेल्या काही दिवसांपासून नाशिक कृषी विभागाने (Nashik Agriculture Department) तळेगाव दिंडोरी व ओझर केलेल्या कारवाईत सिंजेंटा कंपनीचे रिडोमिल व स्कोर, बीएएसएफ कंपनीचे बनावट अ‍ॅक्रोबॅट, कोर्टेवा कंपनीचे बनावट करझेट मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले असून दिंडोरी व ओझर पोलीस ठाण्यात (Dindori and Ozar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हैदराबादी मटेरिअलच्या नावाने शेतकऱ्यांना याची विक्री केली जात होती. यावेळी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नाशिकमध्ये बनावट कीटकनाशके (हैदराबादी मटेरियल्स) वापरण्यापासून शेतकऱ्यांना सावध केले आणि खरी कीटकनाशके खरेदी करण्याचा सल्ला दिला. बनावट औषध विक्रेते, बोगस पावडर आणि कंपन्यांच्या ब्रँड नावाने हैदराबादी मटेरिअलच्या नावाने द्रव पुरवठा केला जात असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान (Damage to crops) होत आहे.

बाजारात सिजेंटा कंपनीच्या नावाने बोगस औषधे विकले जात आहे, शेतकऱ्यांनी दुकानदारांकडून खात्री करूनच रासायनिक औषधांची खरेदी करावी.

संगदीप खिराडे, सिजेंटा प्रा. लि. सीनियर असोसिएट

शेतकऱ्यांनी परवानाधारक दुकानातूनच रासायनिक औषधांची व खतांची खरेदी करावी व त्याचे पक्के बिल घ्यावे, बाहेरील विक्री करणाऱ्यांकडून औषधांची खरेदी करू नये ते प्रामाणिक नसतात.

विजय पाटील कृषी अधिकारी, दिंडोरी तालुका

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com