Video : इगतपुरीत कंपनीला भीषण आग; काही कामगार अडकल्याची भीती

नाशिक | Nashik

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव (Mundhegaon) येथील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत (Jindal Polyfilm Company) भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास कंपनीत भीषण स्फोट (Explosion) झाल्याने ही आग लागल्याचे समजते. तसेच आगीचे रौद्ररूप इतके भयंकर आहे की इगतपुरी तालुक्याच्या विविध भागात आगीचे लोळ पसरल्याचे दिसते. तर या कंपनीत काही कामगार (worker) अडकल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, आगीची माहिती समजताच नाशिकहून अग्निशमन दलाचे (Fire Brigade) बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच पोलिस (Police) देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून रुग्णवाहिका कंपनीत पोहोचल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com