
पेठ | Peth
कुंभाळे (खडकीपाडा) (Kumbhale) येथीलं शेतकर्याच्या शेतातील घरास आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. या आगीत शेती अवजारांसह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे....
सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील कुंभाळेच्या खडकी पाडयावरील शेतकरी नामदेव महादू गावित (Namdeo Gavit) यांच्या शेतातील घर गट क्र . ११३ मध्ये आग लागली.
आगीत घरातील २ ऑईल इंजिन, ४० पाईप, १ हजार बांबू, २ पोते धान्य व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. या प्रकरणी तलाठी कुंभाळे यांनी पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल सादर करण्यात आला.