
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
थोर राष्ट्रपुरुष वीर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंहजी (Maharana Pratap Singh) यांच्या जीवनावरील माहिती
येणाऱ्या नवीन पिढीला व विद्यार्थ्यांना (students) शैक्षणिक अभ्यासक्रमांमधून (educational curriculum) देण्याकरता ज्या पद्धतीने अनेक राष्ट्र पुरुषांचे जीवनावरील माहिती शैक्षणिक अभ्यासक्रमामधून दिल्या जातात.
त्याच धर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांना (students) इयत्ता चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये श्री महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जीवन संघर्ष वरील माहिती समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी राणा की सेना (rana ki sena) नाशिक जिल्ह्याच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे (memorandum) करण्यात आली आहे. अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉ.वसंत ठाकूर (राजपूत) (Founder President Dr. Vasant Thakur) यांनी दिली.
निवेदनावर राणा की सेनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ वसंत ठाकूर, मिलिंद वाबळे, योगेश परदेशी, शैलेश तांबोळी, रंजीत परदेशी, विजय परदेशी, विनायक ठाकूर, राहुल परदेशी, हेमंत परदेशी, संतोष हिवाळे, राजेंद्र जाधव, दत्ता कासार, रोहित ठाकूर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.