टुरिंग थिएटरमधून वेगळा नाट्यप्रयोग

टुरिंग थिएटरमधून वेगळा नाट्यप्रयोग

नाशिक । शुभम् धांडे Nashik

लॉकडाऊन Lockdown झाले आणि सांस्कृतिक कला वर्तुळात सादरीकरणाच्या नवं नवीन माध्यमांचा शोध सुरू झाला होता. त्यातूनच अनेकांनी वेगवेगळे मार्ग सुध्दा शोधले. परंतू शहरीभागातलॉकडाऊन मुळे नाटय, सिनेमागृह बंद झाली होती. पण तिकडे ग्रामीण भागात मात्र, ना नाटय गृह ना सिनेमा गृह. अशा ठिकाणी सादरीकरणाचे जे मार्ग शहरी भागात करोना मुळे शोधले जात होते.

तशाच मार्गांचा शोध घेवून ग्रामीण भागात टुरिंग थिएटर च्या touring theater माध्यमातुन मोबाईलच्या विश्वास हरवलेल्या बालकांसाठी काम सुरू आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या काळात बरीच मुले शाळेपासून दुरावली होती. बरीच ऑनलाइन शिक्षणामध्ये हरवली आणि बर्‍याच मुलांना मोबाईल नसल्यामुळे शिक्षण दूरच झालं होत. या सगळ्यांतून मुलांसाठी छोट्या गोष्टी बसवून, नाटक सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहचवण्याच्या विचारातून टुरिंग थेटरची सुरुवात करण्यात आली.यासोबतच नाटक हे बरेचदा शहरापुरती मर्यादित राहतात. खेडेगावात ते नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे या प्रयोगातून शिक्षणासोबच नाटक ही या भागात पोहचत आहे.

दरम्यान संतोष गायकवाड या तरुणाने नाटयशास्त्रात मध्ये मास्टर पदवी शिक्षण पूर्ण करुन बाल शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या एका संस्थेच्या गोष्टरंग फेलोशिप मध्ये अभ्यातील गोष्टींनच, बाल साहित्याचं नाट्य रूपांतर छोट्या नाटकांमधून सादर करण्याचा अनुभव घेतला. त्यातुनच पुढे फेलोशीप संपल्यानंतरही मुलांसाठी गोष्ट लिहिणे, गोष्ट बसवणे, गोष्टीच नाटक करणे अशा पद्धतीच्या उपक्रमातून टुरिंग थिएटर चा पाया रचला आहे.

काय आहे टुरिंग थिएटर?

टुरिंग थिएटर मध्ये प्रत्येक गावात जाऊन तिथल्या लोकांना एका नाटकाचा अनुभव देणे ही यामागची संकल्पना आहे. टुरिंग सेंटर म्हणजे फक्त पथनाट्य किंवा फिरता चित्रपट दाखवणे नाही तर मुलांसाठी नाटक दाखवणे हा उद्देश आहे.यामध्ये मुलांच्या भावविश्वाशी निगडित गोष्टी निवडून त्याचे नाट्य रूपांतर करणे. टूरिंग थिएटर मध्ये सादर होणार्‍या गोष्टी किंवा नाटक हे फक्त लहान मुलांसाठीच मर्यादित नसून ते मोठ्या साठी सुद्धा तितकेच उपयुक्त असे आहे. दुरिंग थिएटर मध्ये गोष्टींसोबत मुलांना गोष्ट कशी लिहायची, त्या गोष्टीचा नाटक कसे करायचे, तसेच शिक्षकांना गोष्ट कशी सांगायची गोष्ट सांगण्यासाठी असे वेगवेगळे विषय घेऊन कार्यशाळा सुध्दा होतात.

शहरातले नाटक वस्त्यांवर, गावातल्या एखाद्या चौकात, लोकांच्या मनात घेऊन जायचे आहे. तिथल्या मुलांना तो अनुभव द्यायचा आहे . नाटकामुळे लगेच समाज बदलत नाही पण बदलाची सुरुवात होते यावर विश्वास आहे . इथून पुढेही नवं नवीन गोष्टींचे सादरीकरण करत प्रत्येक गावात, प्रत्येक मुलांच्या भावविश्वात आनंद निर्माण करण्याच्या विचारातूनच प्रयोग करत राहणार आहे.

-संतोष गायकवाड, टुरींग थिएटर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com