
पंचवटी | प्रतिनिधी
आज वंचित बहुजन युवा आघाडीची बैठक महानगर प्रमुख रवी पगारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . वंचित बहुजन युवा आघाडीचे पदाधिकारी व सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यार्थी यांची कंत्राटी पद्धतीने होणाऱ्या भरती संदर्भात प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र वंचित युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वात राज्य भर निघणाऱ्या मोर्च्या संदर्भात आपली भूमिका काय असणार आहे या विषयी सविस्तर बैठक पार पडली.
यामधे वंचित बहुजन युवा आघाडीची भूमिका काय असणार आहे यावर चर्चा करण्यात आली याच बरोबर सम्यक विद्यार्थी आंदोलन यांचे योगदान जाणून घेण्यात आले. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक मधुन वंचित बहुजन युवा आघाडी निघणाऱ्या या मोर्चात सुजात आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मोर्चास उपस्थित राहणार आहे. हा मोर्चा शासनाने काढलेल्या नवीन कंत्राटी भर्ती विरोधात असून याच बरोबर शिक्षक भर्ती , खाजागीकरण करुण सामान्य जनतेच्या विरोधात असलेल्या निर्णयाविरुद्ध आहे.
या बैठकिला वंचित बहुजन युवा आघाडीचे नाशिक महानगर महासचिव दिपक पगारे ,उपाध्यक्ष दिलीप खरात, विशाल भवार, अमोल चंद्रमोरे, शिशुपाल गवई, युवराज मनेरे,विजय गायकवाड, संघटक साहेबराव शिंदे, दिपक दोंदे, प्रसिद्धि प्रमुख शशिकांत वाघमारे,सदस्य ओमकार चव्हाण, संतोष शिराळ.
याच बरोबर वंचित बहुजन युवा आघाडी नाशिक तालुक्याचे विकी वाकळे-अध्यक्ष ,संतोष वाघ - महासचिव, मंगेश पवार - संघटक ,गणेश सोनवणे - आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन चे जिल्हा अध्यक्ष मिहिर गजबे,महासचिव - संजय मगर उपाध्यक्ष - आदेश मगर उपाध्यक्ष - विजय साळवे सचिव - राहुल नेतावटे सहसचिव - सुरज भालेराव प्रसिद्धी प्रमुख - निशा धाकतोडे सदस्य - सरला गावित सदस्य - सागर मोरे सदस्य - संकेत अहिरे सदस्य - कार्तिक बर्वे सदस्य - अमित वाविकर आदी उपस्थित होते.