गुन्हेगारांना सुधारण्यासाठी संधी; अन्यथा मोक्का

पोलीस उपायुक्त विजय खरात यांचे आवाहन
गुन्हेगारांना सुधारण्यासाठी संधी; अन्यथा मोक्का

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

नागरिकांना सन्मान मिळवून देण्यासाठी भावनेच्या भरात झालेल्या गुन्ह्याची शिक्षा जीवनभर होऊ नये या उद्देशाने ही चूक सुधारण्याची संधी पोलीस आयुक्तांनी दिली आहे. 'मोका' (Moka) तुमच्यासाठी सज्ज झाला आहे यामुळे सुधरण्याची संधी देणाऱ्या 'मौक्या'चा लाभ घेण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त विजय खरात (Deputy Commissioner Vijay Kharat) यांनी केले...

पोलिस आयुक्तालयातर्फे आयोजित गुन्हेगार सुधार योजनेचे (Criminal Reform Plan) आयोजन शुक्रवारी सातपूर पोलिस ठाण्यात (Satpur Police Station) करण्यात आले होते.

यावेळी अंबड (Ambad) व इंदिरानगर पोलिस ठाण्यांच्या (Indiranagar Police station ) हद्दीतील गुन्हेगारांना बोलवण्यात आले. गुन्हेगारांना सुधारण्याची संधी मिळावी म्हणून पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय (Police Commissioner Deepak Pandey) यांच्या संकल्पनेतून गुन्हेगार सुधार योजना राबविण्यात येत आहे.

सातपूर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित गुन्हेगार सुधार योजनेत रेकॉर्डवरील ३१, अंबडमधील १९ तर इंदिरनगरचे १५ गुन्हेगारांना समुपदेशन करून त्यांच्याकडून चांगल्या वर्तवणुकीचे बंधपत्र लिहून घेण्यात आले.

गुन्हेगाराच्या वर्तणुकीवर वर्षभर लक्ष ठेवले जाणार आहे. यामुळे गुन्हेगारांना मूळ प्रवाहात येण्याची एक संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यासोबतच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

स्वयंरोजगारासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे संदीप गायकवाड (Sandeep Gaikwad) यांनी योजनेमध्ये गुन्हेगाराला सुधारण्याच्या संधी सोबतच त्यांना औद्योगिक वसाहतीमध्ये पात्रतेनुसार रोजगार मिळवून देण्यात येणार आहे. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल त्यांना व्यवसायासाठी मार्गदर्शन व कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

मानसोपचार तज्ञ डॉ. हेमंत सोननीस (Dr. Hemant Sonanis) यांनी गुन्हेगारीत अडकलेल्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी वर्तमानाचा विचार करून सुधारणेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस उपायुक्त विजय खरात, उपायुक्त संजय बारकुंड, सहायक पोलीस आयुक्त सोहेल शेख, सातपूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, इंदिरानगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश मानकर, व अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चौधरी, क्राइम ब्रांचचे वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी गुन्हेगार सुधार योजनेअंतर्गत उपस्थित असलेले जितेंद्र कुलथे, नागेश सोनवणे, जावेद शहा यांनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे व पोलीस उपनिरीक्षक सविता गवांदे यांनी केले.

योजनेचे सर्वत्र कौतुक

मागील महिन्यात शहरातील विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये पार पडलेल्या मेळाव्यातून आतापर्यंत जवळपास 50 गुन्हेगारांकडून चांगल्या वर्तणुकीच बंधपत्रदेखील पोलिसांनी लिहून घेतले तसेच सहा जणांवर प्रस्तावित मोक्का अंतर्गत कारवाई थांबविण्यात आली आहे. यामुळे गुन्हेगारांना सर्वसामान्य माणूस म्हणून जगण्यासाठी प्रोत्साहन देणार्‍या पोलिसांच्या या योजनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com