नेहरूनगर रुग्णालयात लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारणार

नेहरूनगर रुग्णालयात लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारणार

नाशिकरोड । प्रतिनिधी

नेहरूनगर येथील प्रेस रुग्णालयात लहान मुलांसाठी शंभर खाटांचे कोविड सेंटर उभारले जाणार आहे.महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय अधिकार्‍यांच्या पथकाने रुग्णालयाची पाहणी केली. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना महापौर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

सध्या देशभरात करोनाची दुसरी लाट सुरू आहे. येत्या काही दिवसात तिसरी लाट येणार असून यामध्ये लहान मुले सर्वात जास्त बाधित होतील. अशी शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने नेहरूनगर येथील रुग्णालयाची पाहणी केली.

येथे लहान मुलांसाठी शंभर खाटांचे रुग्णालय कोविड सेंटर म्हणून आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे कामकाज लवकर सुरू करण्यात येणार आहे.

मागील महिन्यात खा. हेमंत गोडसे, माजी उप महापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, जयंत जायभावे आदींनी येथे पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी नेहरूनगर रुग्णालय कोविड सेंटर म्हणून आरक्षित करावे, अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे नाशिक महापालिकेने पाठपुरावा करून नेहरूनगर रुग्णालय कोविड सेंटर म्हणून आरक्षित केले आहे. याप्रसंगी भाजपा शहर अध्यक्ष गिरीष पालवे, बापु सोनवणे, कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी, उपअभियंता निलेश साळी, आवेश पलोड आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com