विहिरीत उडी घेत दाम्पत्याची आत्महत्या

विहिरीत उडी घेत दाम्पत्याची आत्महत्या

सटाणा । प्रतिनिधी | Satana

पत्नीने विहिरीत (well) उडी मारून आत्महत्या (suicide) केल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीचा मृतदेह (dead body) विहिरीतून काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पतीनेही त्याच विहिरीत उडी घेऊन आपले जीवन संपविल्याची हृदयद्रावक अशी घटना तालुक्यातील आखतवाडे येथे सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने आखतवाडे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत पोलीस (police) सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की आखतवाडे येथील प्रकाश शंकर ह्याळीज (45) हे पत्नी रूपाली व दोन मुलांसह नुकतेच शेतात बांधलेल्या नव्या घरात राहण्यास गेले होते. परंतु मानसिक संतुलन ठीक नसलेल्या रूपाली ह्याळीज (42) यांनी शेतात करमत नाही असे सांगून गावातील घरीच राहण्याचा आग्रह आपल्या पतीकडे धरला होता.

याबाबत त्यांच्यात बराच वेळा वादही झाल्याचे समोर आले आहे. नातेवाईकांनीही रूपाली यांना अनेक वेळा समजावूनही सांगितले होते. मात्र त्यांनी आपला हेका कायमच ठेवला होता. दरम्यान रूपाली ह्याळीज यांच्यावर एका नामांकित मानसोपचार तज्ञाकडे (Psychiatrist) उपचार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे. दरम्यान सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास रूपाली यांनी अचानक 80 फूट खोल असलेल्या विहिरीत उडी घेतली.

प्रकाश हाळीज यांच्या हे लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करून परिसरातील शेतकर्‍यांना (farmers) जमा करून पत्नीला वाचविण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थित यांपैकी कोणालाही पोहता येत नसल्यामुळे ते शक्य होत नव्हते. याच वेळी कुणालाही काही समजण्या अगोदरच प्रकाश ह्याळीज यांनीही विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या दाम्पत्यास मुलगा व मुलगी असून आई-वडिलांनी एकाच वेळी विहिरीत उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याने हे अल्पवयीन बहीण भाऊ शोकाकुल झाले आहेत. यासंदर्भात जायखेडा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com