त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल

नाशिक | Nashik

मागील वर्षी जून महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरातील (Trimbakeshwar Temple) पिंडीवर पहाटेच्या सुमारास बर्फ (Snow) जमा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता हा बनाव असल्याचे उघड झाले असून याप्रकरणी देवस्थान समितीच्या (Devasthan Committee) वतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे...

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईत; 'हे' आहे कारण

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने याठिकाणी लाखो भाविक (Devotee) महादेवाच्या दर्शनासाठी येत असतात. अशातच मागील वर्षी ३० जून रोजी त्र्यंबकेश्वर मंदिरातील शंकराच्या पिंडीवर बर्फाचे थर जमा झाल्याची बातमी सोशल मीडियावर (Social Media) पसरली होती. त्यानंतर हा व्हिडीओ बराच चर्चेत आला होता. मात्र हा पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना बनाव असल्याचे आता समोर आले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल
काँग्रेसकडून पटोलेंना 'ना-ना'?

दरम्यान, त्र्यंबकेश्वरचे हवामान आणि गर्भगृहातील तापमान पहाता बर्फ कसा तयार झाला यावर अनेकांनी शंका उपस्थित केली होती. त्यावर सत्यशोधन समिती गठित करून सीसीटीव्ही फूटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये देवस्थानच्या तीन पुजाऱ्यांनीच पिंडीवर हा बर्फ ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर याप्रकरणी सुशांत तुंगार आणि त्याला मदत करणारे आकाश तुंगार व उल्हास तुंगार यांच्यावर भादवी कलम ५०५ (३), ४१७ आणि १२० (ब) अन्वये गुन्हा दाखल (Filed a case) करण्यात आला आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा झाल्याचा बनाव; तिघांवर गुन्हा दाखल
जेवढा चिखल फेकाल तेवढंच...; पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com