Nashik News : जमीन खरेदी करताना खोटा शेतकरी पुरावा; गुन्हा दाखल

fraud
fraud

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

तालुक्यातील तळेगाव दिंडोरी (Talegaon Dindori) येथील शेतजमीन (Farm land) खरेदी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) पाचोरा तालुक्यातील (Pachora Taluka) वाळद बु. येथील शेतकरी (Farmer) असल्याचा बनावट पुरावा तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महसूली अधिकारी यांच्या खोट्या सह्या व खोटे शिक्के करुन खोटे दस्तऐवज तयार केल्याच्या विरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात (Dindori Police Station) गुन्हा दाखल झाला आहे...

fraud
Nashik Sinnar Accident News : दुचाकी-ट्रकचा अपघात; कोनांबेतील दोन तरुणांचा मृत्यू

याबाबत माहिती अशी की, दि. ०७ ऑक्टोबर २००४ रोजी गैर अर्जदार यांनी तळेगाव दिंडोरी ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील गट क्र. १९७ ही मिळकत अर्जदार यांचे जेपीए धारक अरुण त्र्यंबक विधाते यांच्याकडून खरेदीदस्त क्रं. ३०६६ / २००४ अन्वये नरेश बाबुलाल शहा रा. झनकर हॉटेलसमोर, शिव सोसायटी, गंजमाळ नाशिक यांनी खरेदी केली. मुंबई कुळ कायदा कलम ६३ च्या अन्वये दोन्ही पक्षकार शेतकरी असल्याने सदर कायदयाच्या (law) अनुषंगाने आवश्यक त्या परवानगीची गरज नाही असे लिहून दिले आहे. यावरुन दिंडोरी येथील दुय्यम निबंधक यांनी संबंधित दस्तऐवज नोंदविला.

fraud
Nashik Crime News : मुखत्यार पत्रात खाडाखोड करून मिळकत गिळंकृत करण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

सदर दस्तान्वये मिळकत गट क्र. १९७ मध्ये नोंद करण्याकामी नरेश शहा यांनी अर्ज दिला व त्याअनुषंगाने शेतकरी पुरावा म्हणून दस्ताची नोंदणी होण्याकामी वाळद बु. ता. पाचोरा येथील शेतजमीन मिळकत गट नं. ४६७ / २ / २ चा ७/ १२ उतारा सादर केला आहे. त्यावरुन मौजे तळेगाव दिंडोरी येथील तत्कालीन तलाठी (Talathi) यांनी फेरफार क्रं. १५२८ अन्यये नोंद घेतली आहे. याबाबत वाळद बु. ता. पाचोरा येथील शेतजमीन मिळकत गट नं. ४६७/२/२ चा ७/१२ उतार्‍याची चौकशी केली असता सदर उतारा महसूली अधिकारी यांच्या खोट्या सह्या व खोटे शिक्के करुन खोटे दस्तऐवज तयार केल्याचे दिसून आले.

fraud
Nashik Road News : हप्ता न दिल्याने पेपर विक्रेत्याचा जाळला स्टॉल

दरम्यान, सदर उतारा शहा यांनी स्वतःच्या फायद्यासाठी वापरुन शासनाची फसवणूक (Fraud) केलेली आहे. तसेच अशाच प्रकारे खोटे उतारे व बेकायदेशीर मार्गाने इतर ठिकाणी देखील केली असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. यावरुन तळेगाव दिंडोरी येथील तलाठी शरद गोसावी यांच्याकडून नरेश बाबुलाल शहा यांच्याविरोधात दिंडोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोरी पोलिस (Dindori Police) करीत आहेत.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

fraud
Video : सततचे अपघात, चालत्या वाहनांचे फुटतायेत टायर्स; कोटंबी, सावळघाट बनतोय मृत्यूचा सापळा
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com