
मालेगाव | प्रतिनिधी
यंत्रमाग कारखान्यात बनावट वीज मीटर बसवून तसेच वीज मीटर मध्ये फेरफार करीत सुमारे अडीच लाख रुपयांची वीज चोरी करणाऱ्या दोघा यंत्रमाग कारखानदारांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
शहरातील फार्मसी नगर भागात मालेगाव पावर सप्लाय कंपनीच्या पथकाने दोघा यंत्रमाग कारखान्यांवर छापे मारत ही वीज चोरी उघडकीस आणली आहे फार्मसी नगर भागातील एका यंत्रमाग कारखान्यात कंपनीचे वीज मीटर गायब करीत बनावट वीस मीटर बसवून मी चोरी केली जात असल्याचे कारवाईस आलेल्या पथकाचे निदर्शनास आले.
तब्बल एक लाख २४ हजार ७८८ रुपयांची वीज चोरी यंत्रमाग कारखानदार मोहम्मद आंबील यांनी केल्याचे दिसून आले तसेच फिरोज अख्तर अब्दुल लतीफ या यंत्रमाग कारखानदारांनी वीज मीटर मध्ये फेरफार करत एक लाख ३३ हजार २८२ रुपयांची ही चोरी केल्याचे पथकाने केलेल्या तपासणी उघडकीस आले होते.
पावर सप्लाय कंपनीचे सार्थक अशोक चिंचकोटकर यांनी प्रकरणी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पवारवाडी पोलिसांनी दोघा यंत्रमाग कारखानदारांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे उपनिरीक्षक परदेशी हे अधिक तपास करीत आहेत