
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक महापालिकेचे भारतीय जनता पक्षाचे (BJP) माजी नगरसेवक भगवान दोंदे यांच्या मुलावर शहरातील इंदिगरानगर पोलीस ठाण्यात (Indigaranagar Police Station) बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल झाला आहे. एका महिलेने याप्रकरणी फिर्याद दाखल केली असून अद्याप संशयिताला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेले नाही...
याबाबत अधिक माहिती अशी की, संदिप भागवान दोंदे (रा.पाथर्डी गांव, नाशिक) असे त्याचे नाव आहे. संदिपने फिर्यादी महिलेला लग्नाचे आमीष दाखवून (Showing the lure of Marriage) जबरदस्तीने अत्याचार करुन तिला गर्भवती (Pregnant) करुन लग्न करण्यास नकार देऊन फिर्यादी महिलेला (Woman) दमबाजी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, ही घटना १० जानेवारी ते २० ऑक्टोबर २०२३ या काळात फ्लॅट क्रमांक १२०६ ई विंग एक्का बिल्डींग, पाथर्डी गांव, नाशिक (Nashik) या ठिकाणी घडली आहे.