
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळाच्या (Maharashtra State Electricity Distribution Board) फिडर पोलमध्ये दोन कोर काळ्या रंगाची सुमारे ३० फूट अंतराच्या वायरने आकडा टाकून घरगुती वापरासाठी अनधिकृत वीज (Unauthorized Electricity) जोडून ११ हजार ६४० रुपयांची ५१२ युनिट चोरी करणाऱ्याविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात ( Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
हा प्रकार ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान शरणपूर (Sharanpur) गावठाण या ठिकाणी घडला. त्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून सरकारवाडा पोलीस ठाण्याकडे (Sarkarwada Police Station) वर्ग करण्यात आला आहे. याबाबत वीज वितरण कंपनीचे सुजित पोपटराव देशमुख (वय ४२ रा. गंगापूर रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी सरिता रविंद्र कटरे (वय ४० रा. शरणपूर गावठाण, नाशिक) यांच्याविरोधात पोलिसांनी (Police) वीज अधिनियम २०३ च्या कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.