विनापरवाना उत्पादन, विक्री 'या' कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल

विनापरवाना उत्पादन, विक्री 'या' कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

पंचवटी (panchavati) येथे दुय्यम दर्जाचे ग्लायफोसेट (Glyphosate) 41टक्के या किटकनाशकांचा (Pesticides) विनापरवाना उत्पादन व विक्री (Unlicensed production and sale) केल्याबद्दल

गुजरातच्या (gujrat) मे.ग्रीन अग्रो बायोटेक (Green Agro Biotech) व मे.आर्या क्रॉप सायन्स (Arya Crop Science) या कंपनी विरुद्ध FIR नो.109/2023 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) कृषी विभागातर्फे (Department of Agriculture) देण्यात आली.

जिल्ह्यात फळ व भाजीपाला पिकाखाली मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून ग्लायफोसेट (Glyphosate) 41टक्के या तणनाशकाचा शेतकऱ्यांकडून (farmers) मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. कीटकनाशक विक्री केंद्रांची (Pesticide sales center) जिल्हा भरारी पथकामार्फत नियमित तपासणी करताना पंचवटी नाशिक येथे मोहिम अधिकारी अभिजीत जमधडे व पंचायत समिती कृषी अधिकारी विजय चौधरी यांना एका कीटकनाशक विक्रेत्याकडे संबधित कंपनीचे ग्लायग्रीन (Glygreen) नामक तणनाशक विक्रीस ठेवल्याचे आढळून आले होते.

या तणनाशका बाबत विक्रेते यांचेकडे कीटकनाशक कंपनीचे उगम प्रमाणपत्र तसेच परवाना बाबतची माहिती नसल्याने तसेच गुणवत्तेबाबत संशय आल्यामुळे कीटकनाशक साठ्यास विक्रिबंद आदेश देण्यात येऊन नमुने घेण्यात आले होते. कीटकनाशक चाचणी प्रयोगशाळेने (Pesticide Testing Laboratory) दिलेल्या अहवालावरून मे.ग्रीन अग्रो बायोटेक,राजकोट, गुजरात या कंपनी द्वारे विपणन केलेल्या Glyphosate 41% (व्यापारी नाव ग्लायग्रीन (Glygreen) चा नमुना मोठ्या फरकाने अप्रमाणित आढळून आला होता.

तसेच पुढील तपासात सदर कंपनीकडे महाराष्ट्र राज्यात कीटकनाशक विक्रीचा परवाना नसल्याचे सिद्ध झाल्यामुळे अप्रमाणित कीटकनाशक साठा जप्त करण्यात आला असून पंचवटी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाशिक विवेक सोनवणे व माजी कृषी विकास अधिकारी, जि.प.,नाशिक रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार

अभिजीत जमधडे, मोहिम अधिकारी, कृषी विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांनी संबंधित कंपनी विरोधात पंचवटी, पोलीस ठाणे,नाशिक येथे कीटकनाशक कायदा 1968,कीटकनाशक नियम 1971,भादवी कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास प्रतीक पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक,पंचवटी, पोलिस ठाणे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com