शेतात जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

शेतात जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ

नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon

नांदगाव (Nandgaon) शहरालगत असलेल्या तांदुळवाडी शिवारात मका शेतात युवकाचा अर्धवट अवस्थेत जळालेला मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे...

नांदगाव शहरालगत असलेल्या येवला रस्त्यावरील तांदुळवाडी शिवारात दिलीप पारख यांच्या गट नं. ६२ मधील शेतात मका पिकामध्ये अंदाजे ३० वर्ष वय असलेल्या युवकाचा दगडाने ठेचून खुन करून नंतर अर्धवट जाळून टाकलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

शेतात जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
दुचाकीची उड्डाणपुलाच्या कठड्याला जोरदार धडक; दोन तरुण पडले २५ फूट खाली

दिलीप पारख यांच्या शेतातील कसणारे प्रकाश घुले हे आज सकाळी शेतात गेले असता त्यांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी त्वरीत नांदगाव पोलिसांना (Nandgaon Police) ही माहिती दिली.

शेतात जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ
अफगाणिस्तान हादरलं! काबूलच्या मशिदीत भीषण बॉम्बस्फोट, २० जणांचा मृत्यू

या युवकाची ओळख अद्याप पटलेली नाही. घटनास्थळी मनमाड उपविभागीय अधिकारी समीरसिंग साळवे, पोलीस निरीक्षक रामेश्र्वर गाढे हे दाखल झाले असून पोलीस पुढील तपास करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com