घरच्यांना व्हिडीओ कॉल करून युवकाने संपवले जीवन

घरच्यांना व्हिडीओ कॉल करून युवकाने संपवले जीवन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

देवळा तालुक्यातील (Deola Taluka) गिरणा नदीत (Girna River) एकाने आपल्या घरच्यांना व्हिडीओकॉल (Video call) करून गिरणा नदीत उडी (Jump) मारून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. सुनील भगवान माळी (32) (Sunil Mali) असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, हा युवक सटाणा तालुक्यातील (Satana Taluka) उमाजीनगर (Umajinagar) येथील रहिवासी होता. शुक्रवारी या युवकाने देवळा तालुक्यातील लोहोणेर (Lohoner) येथील एका पुलावरून गिरणा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी त्याने व्हिडीओ कॉल करत आपल्या कुटुंबाशी संवाद साधला. ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

घरगुती भांडण आणि दारुच्या नशेत त्याने हे पाऊल उचचल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.

याप्रकरणी देवळा पोलिसांनी (Deola Police) आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com