जिल्ह्यात 99 हजार रूग्णांची करोनावर मात

24 तासात 220 रूग्ण बरे
जिल्ह्यात 99 हजार रूग्णांची करोनावर मात

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून बरे होणार्‍या रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 220 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे होणार्‍या रूग्णांचा आकडा 99 हजारांवर पोहचला आहे. तर करोना पॉझिटिव्हचा आकडा घटल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 262 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 65 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 68 हजार 907 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 191 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 30 हजार 541 झाला आहे. मालेगावमध्ये 2 रूग्ण आढळल्याने मालेगावचा आकडा 4 हजार 420 झाला आहेे. जिल्हा बाह्य 4 रूग्ण आढळल्याने त्यांचा आकडा 928 झाला आहे. असा आतापर्यंत करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 4 हजार 796 इतकी झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्‍या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 220 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 99 हजार 406 झाला आहे.

करोना मृत्युची संख्या घटली असून आज दिवसभरात 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील 2 तर 4 ग्रामिण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 852 झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडाही घटला असून दिवसभरात 758 संशयित रूग्ण दाखल झाले आहेत. तर अद्याप 1 हजार 486 संशयितांचे अहवाल प्रलंबीत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 104796

* नाशिक : 68,907

* मालेगाव : 4,420

* उर्वरित जिल्हा : 30,541

* जिल्हा बाह्य : 928

* एकूण मृत्यू: 1,852

* करोनामुक्त : 99,406

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com