जिल्ह्यात ९८ टक्के विद्यार्थ्यांनी दिली 'नीट' परीक्षा.

जिल्ह्यात ९८ टक्के विद्यार्थ्यांनी दिली 'नीट' परीक्षा.

नाशिक | प्रतिनिधी

अनेक वादांनंतर बहुप्रतिक्षित वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी Admission to medical degree courses घेण्यात येणारी नॅशनल इलिजिब्लीटी कम एंट्रान्स टेस्ट अर्थात ‘नीट’ NEET परीक्षा रविवारी (दि.१२) पार पडली.१६ लाखांहून अधिक उमेदवारांनी परीक्षेला बसण्यासाठी अर्ज केले होते.

नाशिक जिल्ह्यातील Nashik District २४ केंद्रावर झालेल्या ‘नीट’ परीक्षेवेळी विद्यार्थ्यांसह पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. सुमारे ९ हजार ५०० विद्यार्थ्यांपैकी ९८ टक्के विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.

करोनामुळे एका वर्गात १२ विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली. सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी १.३० पर्यंत विद्यार्थ्यांची काटेकोरपणे चौकशी व तपासणी करुनच केंद्रांमध्ये प्रवेश दिले गेल्याचे दिसले. परीक्षेपूर्वी तीन तास अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर टप्प्याटप्प्याने प्रवेश देण्यात आल्याने विद्यार्थ्यांची एकाच वेळी होणारी गर्दी नियंत्रित ठेवणे शक्य झाले. त्यावेळी विद्यार्थ्याकडील कागदपत्रांची पडताळणी करून थर्मल स्कॅनिंग करण्यात आले. पालकांना परीक्षा केंद्रापासून दोनशे मीटर लांबच थांबण्याच्या सूचना एनटीएतर्फे कऱण्यात आल्या. त्यामुळे केंद्राबाहेरील गर्दी नियंत्रणात ठेवणे सहज शक्य झाले.

दरम्यान, दरम्यान रसायनशास्त्र, भौतिकशास्त्राच्या प्रश्नांची चांगलाच घाम फोडल्याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी परीक्षा सुटल्यावर दिली.याआधी परीक्षेच्या दोन दिवस अगोदर नीट वादात सापडली होती कारण माध्यमांच्या एका विभागाने नीट प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा केला होता. सुरक्षा यंत्रणांमध्ये कोणतेही उल्लंघन झाले नसल्याचे सांगून अधिकाऱ्यांनी असे दावे फेटाळून लावले आहेत, तरीही विद्यार्थी आणि इतर भागधारक अजूनही चौकशीची मागणी करत आहेत.

प्रवेशद्वारावरून माघारी

विद्यार्थ्यांना यावर्षी पुन्हा ‘ड्रेसकोड’ लागू करण्यात आला होता. त्यामुळे केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांची तारांबळ उडाली. बेल्ट, रुमाल, पाकीट, पेन्स, पैसे, घड्याळ यासह इतर वस्तू परीक्षा केंद्राबाहेरच काढून ठेवाव्या लागल्या. कोणत्याही प्रकारचा पेन, रायटिंग पॅड आणि बॅग नेण्यासही मज्जाव करण्यात आला. त्यामुळे केंद्राबाहेरील जागेत या वस्तूंचा खच दिसून आला. त्यातच पाऊस सुरू असल्याने हॉल तिकिट व ओळखपत्रे जपण्यात विद्यार्थ्यांना अडचणी आल्याचे दिसले. अपुरे कागदपत्र अथवा सोबत असलेल्या वस्तुंमुळे प्रवेशद्वारावरून माघारी पाठविल्यावर पालकांकडे धाव घेणारे विद्यार्थी प्रत्येक केंद्रावर दिसले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com