नाशकात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के

नाशकात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के

नाशिक । Nashik

नाशिक महापालिका प्रशासनाकडुन शहरात गेल्या जुलै महिन्यानंतर करोनाचा संसर्ग रोकण्यासाठी करण्यात आलेल्या उपाय योजना व वाढविण्यात आलेल्या चाचण्यामुळे करोना रुग्णांत लक्षणिय घट झाली आहे.

दिवाळीनंतर रुग्णांत काही वाढ झाल्यानंतर आता पुन्हां रुग्णांचा आकडा दोनशेच्या आसपास आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थेट 96.75 टक्क्यापर्यत आला आहे. राज्यात करोना रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात नाशिक महापालिकेची कामगिरी चांगली असुन ही टक्केवारी दिलासादायक ठरली आहे.

नाशिक महापालिका क्षेत्रात आता करोना संसर्ग कमी झाला असुन आता नवीन करोना रुग्णांचा आकडा 150 ते 269 च्या आत आला आहे. गेल्या दोन अडीच महिन्यापासुन महापालिकेकडुन करण्यात आलेल्या उपाय योजना आणि करोना प्रभाव कमी झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा - व्यवस्था कायम ठेवण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे.

गेल्या जुलै महिन्यात शहरात करोना रुग्णांचा वेग प्रति दिन सुमारे 200 च्या वर होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात सरासरी रुग्णांची संख्या 400 - 500 पर्यत गेली आहे. पुढे सप्टेंबर महिन्यात प्रतिदिन रुग्णांचा आकडा 886 पर्यत गेला. नंतर आक्टोंबर नवीन रुग्णांचा आकडा 200 ते 350 च्या आत असल्याचे समोर आले होते.

नोव्हेंबर करोनाचा प्रति दिन सरासरी 100 ते 150 पर्यत खाली आला होता. आता चालु डिसेंबर महिन्यात नवीन रुग्णांचा आकडा वाढत चालला असुन आता 150 ते 250 पर्यत आला आहे. परिणामी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण थेट 97 टक्क्यापर्यत गेल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com