जिल्ह्यात आढळले ९६ करोना पॉझिटिव्ह; एक रुग्ण दगावला

करोना
करोना

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात दिवसभरात ९६ जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह (corona reports positive) आले आहेत. तर मागील चोवीस तासात ८९ रुग्णांनी करोनावर (Corona) मात केली...

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील चोवीस तासात ९६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक (Nashik) मनपा क्षेत्रातील ४२ रुग्ण, नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ४१ रुग्ण, मालेगाव क्षेत्रातील ०७ रुग्ण तर जिल्हाबाह्य ०६ रुग्णांचा समावेश आहे.

करोना
बरसो रे मेघा मेघा...! नाशकात पावसाची संततधार

जिल्ह्यात आज ०१ करोना रुग्णाच्या मृत्यूची झाली आहे. (Death of Corona Patients). हा रुग्ण नाशिक ग्रामीण क्षेत्रातील होता. आतापर्यंत जिल्ह्यात करोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ८ हजार ९०० इतकी आहे. आजचे एकूण उपचाराखालील रुग्ण ३६७ आहेत.

करोना
सुरगाण्यात धुव्वाधार, नद्या-नाले तुडुंब; पाहा व्हिडीओ

गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी करोना त्रिसूत्रीचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com