
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने (Nashik District Transport Association) स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त (Swatantryacha Amrut Mahotsav) शहरातून 75 ट्रकच्या माध्यमातून भव्य रॅली काढण्यात आली. यात ट्रक चालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने 75 ऐवजी 95 ट्रकचालक सहभागी झाले होते.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पुढे केल्याने देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरातील विविध राज्यांच्या दाखल झालेल्या ट्रक चालकांच्या सहभागाने भव्य झाली काढण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ द्वारका लगतच्या ट्रॅक्टर हाऊस चौफुलीवर करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी (Laxman Sawaji) व असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
ही रॅली ट्रॅक्टर हाऊस द्वारका मार्गे सारडा सर्कल, गडकरी चौक, चांडक सर्कल, मायको सर्कल, एबीबी सर्कल, पपय्या नर्सरी, एक स्लो पॉईंट, गरवारे व तिथून थेट ट्रॅक्टर हाऊस येथे आणण्यात आली.
या सर्व वाहनांवर क्रांतिकारकांची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. तसेच बहुतांश वाहनांवर देशभक्तीपर गीतांचे दनिक्षेपक वाजवण्यात आले प्रत्येक स्ट्रक्चर चारही बाजूला राष्ट्रध्वज लावून अमृत महोत्सवाचा आनंद व्यक्त करण्यात आला.
या उपक्रमात शहरातील सातपूर, अंबड, द्वारका, आडगाव व नाशिकरोड भागातील स्टँडचे वाहनचालक व शहरातील विविध राज्यातून आलेल्या वाहन चालकांनी सहभाग नोंदवला.
नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड यांच्या नेतृत्वाखाली पीएम सैनी, सुभाष जांगडा, अमोल शेळके, सदाशिव पवार, सुनिल बुरड, बालजित शर्मा, भगवान कटिरा, सुभाष जांगडा, ओमकार कानडे, जयपाल शर्मा, शंकर धनावडे, संजय राठी, दीपक ताकाटे, मनोज उदावंत, शरद जगताप, बजरंग शर्मा, महेंद्र सिंग राजपूत, दीपक ढिकले, सुनिल जांगडा, महावीर मित्तल, विशाल पाठक, सिध्देश्वर साळुंके, राजेश शर्मा, दीपक पांडे, सतीश चौधरी, हरिकिशन पारीख, रामभाऊ सूर्यवंशी, ईश्र्वरदास बन्सल, जनार्दन खाडे, विनोद चौधरी, क्रिसन राम, कृपाशंकर सिंग, सुलेमान सय्यद, असिफ भाई, हसरत शेख आदींनी सहभाग घेतला होता.