नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव घटत चालला आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 374 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यात करोनातून बरे होणार्या रूग्णांचा आकडा 99 हजारांवर पोहचला आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95 टक्के इतके झाले आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार मागील 24 तासात 318 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील 184 रूग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 69 हजार 91 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 108 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 30 हजार 649 झाला आहे. मालेगावमध्ये 24 रूग्ण आढळल्याने मालेगावचा आकडा 4 हजार 444 झाला आहेे. जिल्हा बाह्य 2 रूग्ण आढळल्याने त्यांचा आकडा 930 झाला आहे.

दुसरीकडे करोनावर मात करणार्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवसे वाढ होत आहे. 24 तासात जिल्ह्यातील 374 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 99 हजार 780 झाला आहे.

करोना मृत्युची संख्या घटली असून आज दिवसभरात 6 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नाशिक शहरातील1 तर 5 ग्रामिण भागातील आहेत. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 1 हजार 858 झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडाही घटला आहे. तर अद्याप हजार संशयितांचे अहवाल प्रलंबीत आहेत.