
नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक येथे झालेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर (Dr Jayant Naralikar) यांची संमेलनाचे मुख्य समन्वयक माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) व लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर (Jayprakash Jategaonkar) यांनी लोकहितवादी मंडळाच्या वतीने पुणे येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी नारळीकर दाम्पत्याचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ.शेफाली भुजबळ (Dr Shephali Bhujbal), चित्रकार राजेश सावंत (Rajesh Sawant), समाधान जेजुरकर (Samadhan Jejurkar), लोकहितवादी मंडळाचे भगवान हिरे (bhagwan hire),किरण समेळ (Kiran Samel), हर्षल खैरनार (Harshal Khairnar( आदी उपस्थित होते.