विषारी पाणी पिल्याने नऊ मेंढ्यांचा मृत्यू; 32 अत्यवस्थ

विषारी पाणी पिल्याने नऊ मेंढ्यांचा मृत्यू; 32 अत्यवस्थ

ओझर जवळील घटना

ओझर । Ozar

येथून जवळच असलेल्या सोनेवाडी येथे अनधिकृतपणे चालविलेल्या तेलाचे डबे धुण्याच्या व्यवसायामुळे दत्तू देवराम पल्हाळ यांच्या मेंढ्यांनी तेल साचलेले विषारी पाणी पिल्याने यात 9 मेंढ्यांचा मृत्यू झाल्या असून 32 मेंढ्या अत्यवस्थ आहेत.

पल्हाळ यांचेकडे जवळपास 40 च्या वर मेंढ्या असून पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे यांनी घटनास्थळी धाव घेत अत्यवस्थ मेंढ्यांवर उपचार सुरू केले आहे.

सोनेवाडी येथे गावातून व परिसरातून तेलाचे डबे आणून ते औषधाने स्वच्छ करून पुन्हा तेल गिरण्यांना विक्री करण्याचा अनधिकृत व्यवसाय चालतो. त्यास ग्रामपालिकेने कोणत्याही प्रकारची परवानगी किंवा व्यवसाय दिलेला नाही.

हा डबेवाला तेलाचे गोळा केलेले डबे एकत्र आणून ते केमिकलने स्वच्छ करतो व हे पाणी परिसरात वाहत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य तयार होत असल्याचे सोनेवाडी येथील ग्रामस्थांचे म्हणणे असून संबंधितांना अनेकवेळा सूचना देऊनही ते ऐकत नाही. उलट सदरची व्यक्ती ही हमरीतुमरी करते. काल सोमवारी पल्हाळ हे नेहमीप्रमाणे त्यांच्या मेंढ्या व मेंढ्यांची पिल्ले घेऊन या परिसरात चारावयास गेले होते.

तेथे या मेंढ्यांनी डबे धुतलेले पाणी पिल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पल्हाळ यांनी सदरच्या मेंढ्या आखरात आणल्यावर यातील 8 मेंढ्या मृत झाल्या असून 10 ते 12 मेंढ्या अत्यवस्थ झाल्या आहे. त्यानंतर अत्यवस्थ मेंढ्यांची संख्या वाढत गेली. सदरचे वृत्त पशुवैद्यकीय अधिकारी वानखेडे यांना समजताच त्यांनी तत्काळ मेंढ्यांवर औषधोपचार करून त्यांना सलाईन लावले.

कामगार तलाठी उल्हास देशमुख यांनीही या घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी ओझरचे पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेची पोलीस स्टेशनला नोंद केली आहे.

जि.प. सदस्य यतीन कदम यांनीही घटनास्थळी भेट देऊन सदर व्यवसायिकास ग्रामपंचायतीने कुठलीही परवानगी दिलेली नसून ग्रामपंचायत दप्तरी तशी नोंद नाही. त्यामुळे याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे जि.प. सदस्य यतीन कदम म्हणाले. मेंढ्यांचे मालक दत्तू पल्हाळ यांचा कुटुंबाचा चरितार्थ मेंढ्यांवरच अवलंबून असल्याने त्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com